मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेना पक्षाची दुसरी २० उमेदवारांची यादी जाहिर आमश्या पाडवी आणि भावना गवळी यांना उमेदवारी जाहिर

विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस राहिलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीतील शिवसेना पक्षाकडून आज दुसरी यादी जाहिर करण्यात आली. तसेच भाजपाचे माजी खासदार रावसाहेब जाधव यांच्या कन्या संजना जाधव बोईसरचे विलास तरे यांनी आज ठाणे येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यापैकी रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांना शिवसेनेतून उमेदवारी पक्की समजली जात आहे.

शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्यावतीने आज दुसरी उमेदवारांची यादी आज जाहिर करण्यात आली आहे. यात यादीत शिवसेना उबाठा गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले आमश्या पाडवी यांना अक्कलकुआतून उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर बाळापूरमधून बळीराम भगवान शिरसकर यांना, रिसोडमधून माजी खासदार भावना गवळी यांना तर हदगाव मधून संभाराव उर्फ बाबुराव कदम कोहळीकर यांना, नांदेड दक्षिण मधून आनंद शंकर तिडके पाटील (बोंडारकर) यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.

परभणीतून शिवसेना शिंदे पक्षाकडून आनंद शंशाक भरोसे, पालघरमधून राजेंद्र येड्या गावित, बोईसर अ.ज. विलास सुरुर तरे, भिवंडी ग्रामीण अ.ज. शांताराम तुकाराम मोरे, भिवंडी पूर्व संतोष मंजय्या शेट्टी, कल्याण पश्चिममधून विश्वनाथ आत्माराम भोईर, अंबरनाथ अ.जा. मधून डॉ बालाजी किणीकर, विक्रोळीतून सुवर्णा करंजे, दिंडोशीतून माजी खासदार संजय ब्रिजकिशोरलाल निरूपम यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. वास्तविक पाहता संजय निरूपम हे लोकसभा निवडणूकी दरम्यानही इच्छुक होते.

अंधेरी पूर्वमधून भाजपामधून शिंदे यांच्या शिवसेनत प्रवेश केलेले मूरजी पटेल यांना उमेदवारी दिली असून चेंबूरमधून तुकाराम रामकृष्ण काते यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात खासदार मुरली देवरा यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. पुरंदरमधून माजी मंत्री तथा माजी आमदार विजय सोपान शिवतारे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर कुडाळमधून नारायण राणे यांचे सुपु्त्र तथा भाजपामधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले निलेश राणे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. तसेच कोल्हापूर उत्तर मधून माजी आमदार राजेश क्षिरसागर यांना पुन्हा उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.

शिवसेना शिंदे गटाने जाहिर केलेली २० उमेदवारांची दुसरी यादी खालील प्रमाणे:=

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देणार ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित , ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील विद्यार्थी सहभागी

महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने प्रशासनासमोरील आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्यासाठी युवा प्रतिभांना व्यासपीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *