मुख्यमंत्री निवासस्थानी डान्सबारबाबत डिल झाली

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी

मुख्यमंत्री निवासस्थानी डान्सबारबाबत डिल झाली असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.

दोन वर्षापूर्वी भाजपचा वरिष्ठ नेता आणि डान्सबार मालक यांच्यात बैठक झाली आणि शायना एनसी आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मध्यस्थी केली होती आणि त्यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयात सरकारने बाजू कमकुवत ठेवली असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. दरम्यान आमचं सरकार आलं की पुन्हा डान्सबार बंदी आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

डोंबिवली शस्त्रप्रकरणात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे आरोपीची पाठराखण करत असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे पोलिसांनी धनंजय कुलकर्णी यांचा रिमांड मागितला नाही असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

हा शस्त्रसाठा परदेशी बनावटीच्या आहे.हा साठा भाजपने आणल्याचा आरोप करतानाच किती विदेशी बनावटीचे हत्यार आणले ? ही तस्करी आहे का? संपुर्ण महाराष्ट्रामध्ये ही हत्यार दिली आहेत का? असा सवाल ही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत अशाच हत्यारांचा वापर झाल्याचा आरोपही ही त्यांनी केला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंबही सुरक्षित नाही तर सामान्य जनतेचे काय? अहिल्यानगर जिल्ह्यातील दोघांना मारहाण करून लघवी पाजण्याचा विकृत प्रकार, गुन्हेगारांना मोक्का लावा; गोरक्षणाच्या नावाखाली चाललेला नंगानाच थांबवा.

महाराष्ट्र पोलिसांचा एकेकाळी प्रचंड दबदबा होता, याला मागील १२-१३ वर्षात काळिमा फासला आहे. आज महाराष्ट्र पोलीस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *