प्रशांत किशोर यांना निवडणूक आयोगाची नोटीस बिहार निवडणूकीच्या रणधुमाळीत आयोगाची नोटीस ३ दिवसात उत्तर देण्याची मुदत

बिहार विधानसभा निवडणूकीची एकाबाजूला रणधुमाळी सुरु असताना आणि प्रत्येक राजकीय पक्षांकडून तशी जोराची तयारी करण्यात येत आहे. मात्र जनसुराज्य पक्षाचे सर्वेसर्वा प्रशांत किशोर हे दोन राज्यांचे मतदार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बिहार मध्ये खळबळ उडाली आहे.

प्रशांत किशार हे दोन राज्यांचे मतदार असल्याच्या दाव्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका सुरु केली. त्यानंतर आता या प्रकरणात निवडणूक आयोगाने प्रशांत किशोर यांना नोटीस बजावली आहे. तसेच तीन दिवसात उत्तर देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या तोंडावर प्रशांत किशोर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत.
निवडणूक आयोगाने प्रशांत किशोर यांचं नाव बिहार आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत असल्याचे पुरावे समोर आल्यानंतर

कारणे दाखवा नोटीस बजावली. दरम्यान, पश्चिम बंगाल मधील भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या यादीत प्रशांत किशोर याचं नाव असल्याचं आरोप करण्यात आला. मात्र नियमानुसार एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणी करता येणार नाही. या नियमाचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागू शकतं.

प्रशांत किशोर यांच नाव बिहारमधील मतदार यांद्याप्रमाणेच पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांमध्ये देखील आहे. पश्चिम बंगालमधील मतदार यादीनुसार १२१, कालीघाट रोड हा त्यांचा पत्ता देण्यात आला आहे. हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातील परिसर असून भवानी पूरमधील पक्षाचं कार्यालयदेखील याचं परिसरात आहे.

२०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीसाठी प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जींचे निवडणूक रणनीतीकार म्हणून काम केलं होतं. सासाराम लोकसभा मतदारसंघातील कारगहर विधानसभा मतदारसंघात किशोर यांच नाव आहे. मध्य विद्यालय कोनार या मतदार केंद्रावर त्यांचं मतदान होणार आहे. कोरान हे प्रशांत किशोर यांच्या वडिलांच गाव आहे.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *