एनटीएच्या परिक्षा पध्दतीत सुधारणा करण्याठी केंद्राकडून सात जणांची समिती इस्त्रोचे माजी प्रमुख करणार समितीचे नेतृत्व

एनटीए अर्थात नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या एनईईटी परिक्षेत आणि मोठ्या प्रमाणावर सावळा गोंधळ निर्माण झाल्याची माहिती पुढे आली. तसेच एनटीएच्या विरोधात अनेक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली. त्यामुळे या परिक्षेत झालेल्या पेपरफुटी प्रकरणी अखेर केंद्र सरकारला पेपरफुटीच्या विरोधात काँग्रेस नेत्या राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे रातोरातो केंद्रातील सरकारने पेपरफुटी रोखण्यासाठी नवा कायदा लागू केला. त्यानंतर आता एनटीएच्या परिक्षा निर्धोकपणे पार पडावी यासाठी आत इस्रोचे माजी प्रमुखांच्या नेतृत्वाखाली सात तज्ञांची समिती केंद्र सरकारने स्थापन केली.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत परीक्षा पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी २२ जून रोजी शिक्षण मंत्रालयाने माजी इस्रो प्रमुख के राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली तज्ञांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली.

सात सदस्यीय समिती परीक्षा प्रक्रियेच्या यंत्रणेतील सुधारणा, डेटा सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये सुधारणा आणि एनटीए NTA ची रचना आणि कार्यप्रणाली यावर शिफारशी करेल, असे मंत्रालयातील शिक्षण विभागाने सांगितले.

ही समिती दोन महिन्यांत आपला अहवाल मंत्रालयाला सादर करेल, असेही त्यात म्हटले आहे. या समितीत सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबादचे कुलगुरू प्रोफेसर बी जे राव आणि एम्स दिल्लीचे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांचाही समावेशही या पॅनलमध्ये करण्यात आला आहे.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *