केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोरोना पॉझिटीव्ह व्टिटरवरून दिली माहिती, रूग्णालयात भर्ती होणार

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी

देशाचे केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपा नेते अमित शाह यांना कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने ते लवकरच भर्ती होणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरवरून दिली.

दिल्लीतील वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नाला यश येत होते. मागील काही दिवसात दिल्लीतील रूग्ण संख्या नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत होते. मात्र शाह यांना कोरोनाची लागण झाली. त्याची लक्षणे दिसत असल्याने त्यांनी नुकतीच कोरोनाची चाचणी केली. त्यात त्यांचा अहवाल आज पॉझिटीव्ह आल्याने त्यांनी रूग्णालयात भर्ती होण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना त्यांनी सेल्फ क्वारंटाईन होण्याचे आणि चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

 

About Editor

Check Also

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारणार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटरसोबत महामंडळाचा सामंजस्य करार

महाराष्ट्रातील लाखो महिला प्रवाशांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य मार्ग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *