आमदार सुरेश धस यांची माहिती, तुरुंगात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण तुरुंगाधिकारी म्हणाले अशी कोणतीची भांडणे झाली नाहीत

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर सध्या केजच्या न्यायालयात खटला सुरु आहे. मात्र या दोघांना ठेवण्यात आलेल्या तुरुंगातच असलेल्या दुसऱ्या टोळीच्या लोकांना वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना मारहाण केल्याची माहिती भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिली. विशेष म्हणजे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याच्यावर तुरुंगातीलच महादेव गीते आणि अक्षय आठवले यांच्या टोळीकडून मारहाण करण्यात आल्याचेही सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सुरेश धस पुढे बोलताना सांगितले की, फोन करण्याच्या कारणावरून दोन टोळ्यांमध्ये राडा झाला. त्यातून वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना मारहाण झाली. दोन टोळ्यांमध्ये वाद झालं असल्याचं सांगत प्रशासनाकडून मात्र इतरांची नावे सांगण्यात येत आहे. पण हा वाद दोन मुख्य टोळ्यांमध्येच झाला आहे. बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकतं. माझी तर अशी माहिती आहे की, आकांना स्वतंत्र जेवण दिलं जातंय. एक स्पेशल फोन आहे ज्यावरून आकांच थेट कनेक्शन परळीतल्या कोणत्या तरी फोनशी होतं अशी माहिती मला मिळाली असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की, एसपींनी लक्ष ठेवायला हवं होतं. मुख्यालयात असूनही कैद्यांना व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात होती. प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती का पाहिली नाही. हे बाहेर हत्या करून थकलेत ते आत जाऊन हत्या करणार नाहीत हे कशावरून असा सवालही यावेळी केला.

सुरेश धस पुढे बोलताना म्हणाले की, पाच नंबरच्या बरॅकमध्ये महादेव गिते, सहा नंबरच्या बरॅकमध्ये अक्षय आठवले, तर नऊमध्ये वाल्मिक कराडला ठेवल्याचं सांगण्यात येत आहे. जेवणासाठी किंवा इतर कारणासाठी आरोपींना बाहेर आणलं असता तेव्हा ही हाणामारी झाली असावी असा अंदाजही यावेळी व्यक्त केला.

पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की, तुरुंगात कर्मचारी कमी आहेत. तर अधिकाऱ्यांनी काही आरोपी अमरावती, नागपूर, नाशिक आणि संभाजीनगर इथल्या तुरुंगात पाठवायला हवं होतं. अनेक आरोपी लातूर तुरुंगच का मागतात असा सवाल करत कोणत्या आरोपीचे नातेवाईक लातूर किंवा बीड तुरुंगात काम करतात हे तुरुंग अधिकाऱ्यांना माहिती नसतं का असा सवालही यावेळी उपस्थित केला.

तसेच सुरेश धस म्हणाले की, शोले चित्रपटात आम्ही पाहिलंय की अधिकारी म्हणतात जेल के कोने कोने मे हमारे जासूस है, मग हे जासूस काय करत होते, कालिया चित्रपटात आम्ही तुरुंगात झालेल्या हाणामाऱ्या पाहिल्या होत्या, आता बीडच्या तुरुंगात कालिया तयार झाला की काय कुणास ठाऊक असा सवालही यावेळी केला.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *