डिझेलच्या किंमतीत २५ रूपयाने वाढ: राष्ट्रवादीने पंतप्रधानांकडे केली “ही” मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी पाठविले पत्र

देशातील पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार नुकतीच डिझेलच्या दरात २५ रूपयांने वाढ केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवित किमान या दरवाढीतून राज्य सरकार, महापालिका आणि परिवहन बसेसना तरी सूट द्या अशी मागणी केली.

प्रवक्ते महेश तपासे यांनी पंतप्रधानांना पाठविलेले पत्र ट्विट केले असून त्या पत्रामध्ये यासंदर्भातील मागणी केलेली आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये होत असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ लक्षात घेता केंद्र सरकारने घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात प्रति लिटर २५ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र या निर्णयाचा सरकारी आणि महानगरपालिका परिवहन सेवांवर आर्थिकदृष्ट्या विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केली.

त्यामुळे देशातील राज्य सरकारे आणि महापालिका परिवहन बसेसना डिझेल दरवाढीतून सूट देण्यात यावी अशी विनंती वजा मागणी तपासे यांनी पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केली.

डिझेलच्या दरात एकदम २५ रूपयांची दरवाढ करण्यात आल्याने आता सर्वसामान्यांसाठी आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढण्याची शक्यता असून त्यांमुळे महागाईच्या निर्देशांकात नवा उच्चांक निर्माण होईल अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, SIR च्या माध्यमातून ३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली; लोकशाहीचा गळा घोटण्याचा डाव संशयास्पद मतदारांची नावे मतदारसंघ व बुथनिहाय प्रसिद्ध करा, दावे व हरकतीसाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून द्या

भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळून, त्यांना मतदानाच्या संवैधानिक अधिकारापासून वंचित ठेवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *