त्या वक्तव्यांवरून रंगला चंद्रकांत पाटील आणि नवाब मलिक यांच्यात कलगीतुरा खिशात ठेवतो असे म्हणत पाटील यांनी डिवचले मलिक यांना

मुंबई : प्रतिनिधी

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी कारवाई केलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या बनावट जात प्रमाणपत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून दररोज नवनवे गौप्यस्फोट करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने आज मलिक यांनी भाजपा नेत्याचे याप्रकरणात हात असल्याचा नव्याने आरोप केला. या वक्तव्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, नवाब मलिक यांच्यासारखी माणसे मी खिशात ठेवतो अशी उपरोधिक टीका केली.

त्यावर नवाब मलिक यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर देत, चंद्रकांत पाटील यांची मी वाट बघतोय ते कधी त्यांच्या खिशात टाकतायत असे एकप्रकारे प्रतिआव्हान देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा खिसा इतका मोठा आहे हे मला माहीत नव्हतं… मी वाट बघतोय ते कधी त्यांच्या खिशात टाकतायत असे खुले आव्हान त्यांना दिले.

चंद्रकांत पाटील यांनी मला त्यांच्या खिशात ठेवले तर मी त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणणार आहे. त्यासाठी चंद्रकांतजी मला तुमच्या खिशात टाका असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

त्यानंतर या संदर्भात पुन्हा चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, कुणाच्या तरी खिशात राहण्याची, कुणाच्या तरी इशाऱ्यावरून बोलण्याची श्री. नवाब मलिकसाहेबांना सवयच असावी. तुमचं खिशात ठेवून दाखवाच हे आव्हान स्वीकारलं. माझ्या खिशात दिसेल संघाची शिस्त, शुचिता, आदरभावना आणि योग्य मूल्यांसह योग्य व्यक्तींप्रती निष्ठा. मलिकसाहेब, हे सगळं झेपेल तुम्हाला? असा उपरोधिक टोलाही मलिक यांना लगावला.

दरम्यान खिशात ठेवण्याच्या या वक्तव्यावरून राष्नट्वारवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलाच सामना रंगणार असल्याचे दिसून येत असून आता याची सुरुवात झालेली असल्याचे दिसून याचा पुढचा अंक लवकरच दिसून येईल असे दिसते.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देणार ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित , ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील विद्यार्थी सहभागी

महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने प्रशासनासमोरील आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्यासाठी युवा प्रतिभांना व्यासपीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *