शिळे आणि वास येणारे अन्न दिल्यावरून एसशिंचे आमदार संजय गायकवाड यांनी टॉवेलवर कॅटींनमध्ये येत वेटरला मारहाण केली. त्यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेचे पडसाद विधिमंडळात उमटले. विरोधकांनी याविषयीचा मुद्दा विधिमंडळाच्या विधान परिषदेत लावून धरला. त्यानंतर याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांना योग्य ती कारवाई करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानुसार अखेर आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश गृह विभागाकडून आल्यानंतर मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी हॉटेलच्या वेटरला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर एखाद्या लोकप्रतिनिधींने हॉटेलमधील वेटरला मारहाण केल्याचे प्रकरण कदाचित राज्यात पहिलेच असावे. तसेच आमदार संजय गायकवाड यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे हॉटेलमधील अन्नाच्या दर्जाबद्दल तक्रार केली. अन्न व औषध प्रशासनानेही हॉटेलमधील अन्न निकृष्ट दर्जाचे आणि शिळे असल्याचा अहवाल राज्य सरकारला सादर केला. त्यामुळे काल रात्री त्या हॉटेलचा परवाना अन्न व औषध प्रशासनाकडून रद्द करण्यात आला.
हे ही वाचाः-
आमदार संजय गायकवाड यांचा वेटरला मारहाण करताचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्री म्हणाले…
हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, आमदार संजय गायकवाडला पक्ष तरी कसा पाठीशी घालतो?
संजय गायकवाड यांना एकनाथ शिंदेंकडून कडक शब्दांत समज
यासंदर्भात मुंबई पोलिसांनी शुक्रवारी (११ जुलै २०२५) सांगितले की, आमदार वसतिगृहातील कॅन्टीन कामगाराला झालेल्या मारहाण प्रकरणी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येत आहे. “मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे,” असल्याचेही सांगितले.
मंगळवार (८ जुलै २०२५) रात्री घडलेल्या या घटनेनंतर, बुलढाण्याचे दोन वेळा आमदार राहिलेल्या संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त करण्यास नकार दिला आणि गरज पडल्यास ते पुन्हा असेच कृत्य करणार असल्याचे निक्षूण सांगितले.
हल्ल्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये, आमदार संजय गायकवाड कॅन्टीन कामगाराला मुक्का मारताना आणि चापट मारताना दिसत आहेत आणि दावा करत आहेत की त्यांना शिळे अन्न देण्यात आले आहे.
Marathi e-Batmya