राजकारण

एसटी संपः खोत-पडळकरांकडून तुर्तास माघार, मात्र कर्मचाऱ्यांचा नकार विलिनीकरणाचा निर्णय होईपर्यंत संप सुरुच ठेवण्याच्या भूमिकेवर कर्मचारी ठाम

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसह एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी तुर्तास मागे घेत असल्याची भूमिका जाहीर केली. मात्र राज्यात कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संप आंदोलनाबाबत कामगारांनी निर्णय घ्यावा असे आणि तो आम्हाला मान्य असेल अशी भूमिका या दोघांनी जाहीर केली. काल …

Read More »

मविआ नेत्यांच्या उपस्थितीत शेतकरी नेते राकेश टिकैत, हनन मुल्लांचा मुंबईत मेळावा कॉ.प्रकाश रेड्डी नाना पटोले, नवाब मलिक यांची पत्रकार परिषद

मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील भाजपाच्या सरकारने अन्नदात्याची मोठी हालअपेष्टा केली. सत्तेत येण्यापूर्वी मोठी आश्वासने दिली पण सत्तेत येतात भाजपाचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले. तीन काळे कृषी कायदे आणून शेतकऱ्यांना संपवण्याचे षडयंत्र आखले होते, त्याला विरोध करत शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केले. शेवटी कायदे मागे घेत असल्याची घोषणा सरकारला करावी लागली. पण या …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ४१ टक्के वाढ, मात्र संप मागे घेण्याबाबत शिष्टमंडळाकडून अवधी कामावर हजर होणाऱ्यांचे निलंबन तात्काळ रद्द- एसटी अध्यक्ष अनिल परब यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी काल रात्री आणि आज दिवसभर एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळ आणि एसटी अध्यक्ष अनिल परब यांच्यात बैठकांचे सत्र पार पडल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ४१ टक्के वाढ करत असल्याचे जाहीर करत दर महिन्याच्या १० तारखेच्या आत पगार होईल याची हमी राज्य सरकारने घेतल्याचे सांगत एसटी कामगारांनी तात्काळ कामावर हजर व्हावे असे …

Read More »

काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित कोरोनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्याबाबत केली ही मागणी कोरोनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना ४ लाखाचे भरपाई द्या

मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात जवळपास दिड लाख नागरीकांचा मृत्यू झाला. तर संपूर्ण देशभरात लाखो नागरीकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर केलेले असतानाही केंद्र सरकारने या आजारामुळे मृत्यू पडलेल्यांसाठी केवळ ५० हजार रूपयांची तुटपुंजी रक्कम देण्याचे जाहिर केले. मात्र ही रक्कम फारच …

Read More »

मंत्री परब म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांशी सकारात्मक चर्चा, नवा प्रस्ताव दिला कर्मचाऱ्यांबरोबर पहिल्यांदा सकारात्मक चर्चा, काय झाली चर्चा

मुंबईः प्रतिनिधी १५ दिवसाहून अधिक काळ आपल्या विविध मागण्यांसह राज्य सरकारमध्ये विलीनकरण करण्याच्या मुख्य मागणीप्रश्नी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या अनुषंगाने राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून समितीचा निर्णय होईपर्यत पगारात अंतरिम वाढ देण्याचा नवा प्रस्ताव कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला देण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी …

Read More »

त्या हिंसक घटनांची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्तीकडून चौकशी करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

कोल्हापूरः प्रतिनिधी त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना, जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल करून; महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती व नांदेड येथे नुकत्याच दंगली झाल्या. पंधरा हजार ते चाळीस हजार लोकांचे जमाव रस्त्यावर उतरून दुकाने, कार्यालये, गाड्या यांचा विध्वंस केला गेला. या घटनेचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोल्हापुरात …

Read More »

पंकजा मुंडेंचा इशारा: ठाकरे सरकार, ओबीसींची फसवणूक थांबवा राज्य मागासवर्ग आयोगाला ओबीसींचा एंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी साडेचारशे कोटींची मदत द्या

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण केवळ ठाकरे सरकारमुळे गमावले असून हे आरक्षण पुन्हा टिकाऊ स्वरुपात मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एंपिरिकल डेटा गोळा करण्याचा उपाय ठाकरे सरकार करत नाही. ठाकरे सरकारने ओबीसींची फसवणूक थांबवावी आणि राज्य मागासवर्ग आयोगाला ओबीसींचा एंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी आवश्यक साडेचारशे कोटी रुपयांची मदत करावी, अशी …

Read More »

भाजपाला गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का? दंगली पेटवून त्यावर राजकीय पोळ्या भाजण्याचे भाजपचे षडयंत्र-नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी अमरावती शहरातील परिस्थिती शांत झालेली असताना भारतीय जनता पक्षाकडून जाणीवपूर्वक चिथावणी दिली जात आहे. भारतीय जनता पक्ष राजकीय स्वार्थासाठी दंगली भडकावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय जनता पक्षाला गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का? असा संतप्त सवाल करत भाजपा नेत्यांचे सत्ता गेल्यापासूनचे वागणे विरोधी …

Read More »

मुख्यमंत्र्यांवर या उपचाराला सुरुवात: पण प्रकृती उत्तम उद्धव ठाकरे यांच्यावर फिजिओथेरपी सुरू

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मानेवरील स्पाईन सर्जरी यशस्वी झाली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत आहे. मात्र त्यांच्यावर आता फिजिओथेरपीचे उपचार सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा रूग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी एसएन रिलायन्स रूग्णालयात स्पाईन सर्जरी करण्यात …

Read More »

एसटी कर्मचारी संप: पवार-अनिल परब यांच्या बैठकीत “या” सर्व बाबींवर चर्चा परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात आज वरळी येथील नेहरू सेंटर येथे बैठक पार पडली. जवळपास चार तास ही बैठक सुरु होती. या बैठकीसाठी परिवहन आणि अर्थविभागाचे अधिकारीही उपस्थित होते. त्यामुळे या …

Read More »