राजकारण

शाळांची घंटा १ तारखेलाच वाजणारः फक्त या नियमांचे पालन करावे लागणार पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई: प्रतिनिधी येत्या १ डिसेंबर पासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. शाळा सुरू …

Read More »

आघाडी सरकार विधिमंडळाला घाबरणारे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे टीकास्त्र

मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या नावाखाली विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी करणारे महाविकास आघाडीचे सरकार हे विधिमंडळाला घाबरणारे सरकार आहे, अशी धारदार टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी सोमवारी केली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोना संकटातून हळूहळू सर्वच व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. संसदेचे …

Read More »

परमबीर सिंग व सचिन वाझे भेटीमागे कोण? चौकशी करण्याची काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग व सचिन वाझे हे चांदिवाल आयोगासमोर चौकशीला जाण्यापूर्वी भेटले अशी माहिती मिळतेय हे नियमाला धरुन नाही. चौकशीला जाणारे दोन व्यक्ती वा आरोपी अशा प्रकारे भेटू शकत नाहीत अशी नियमावली आहे. मग अशा परिस्थितीत ते दोघे का भेटले? कशासाठी भेटले? याची उच्चस्तरीय चौकशी झाली …

Read More »

अनुदान सहाय्यतेत मोदी सरकारची महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकार विरोधी पक्षांच्या सरकारांशी भेदभाव करत असून महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे काम करत असते. आरटीआय अंतर्गत मागविलेल्या माहितीनुसार अनुदान सहाय्यतेत मोदी सरकार महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक देत असल्याच्या आमच्या संशयाला पुष्टी मिळते आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हटले आहे. यासंदर्भात …

Read More »

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची अधिकृत तारीख अखेर जाहीर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत-विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान मुंबईत होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज एक आठवड्याचे निश्चित करण्यात आले असून पुढील कामकाजासंदर्भात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक २४ डिसेंबर २०२१ रोजी घेऊन पुढील निर्णय घेण्यात …

Read More »

निवडणूक उमेदवारांसाठी चांगली बातमीः जात प्रमाणपत्र सादर करण्यास १ वर्षाची मुदतवाढ महानगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १२ महिन्यांची मुदत

मुंबईः प्रतिनिधी कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या पदांसाठी निवडणुक लढविण्याच्या संधीपासुन वंचित रहावे लागू नये यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी …

Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णयः राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढवणार राज्य मंत्रिमंडळाने दिली वाढविण्यासंदर्भात मान्यता

मुंबईः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी राज्यातील महापालिका आणि नगर परिषदांमधील सदस्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची …

Read More »

मुख्यमत्री उध्दव ठाकरे उद्या मंत्रालयात? मंत्रालयात होणार मंत्रिमंडळाची बैठक

मुंबई: प्रतिनिधी जवळपास तब्बल दिड वर्षानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे उद्या सोमवारी २९ नोव्हेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनिमित्त मंत्रालयात येणार आहे. तसेच मागील दोन आठवड्याहून अधिक काळ त्यांच्यावरील शस्त्रक्रियेमुळे रूग्णालयात उपचार घेत असलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांना सोमवारीच रूग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे जवळपास सहा महिन्याच्या कालावधीनंतर मुख्यमंत्री मंत्रालयात येणार …

Read More »

बैठकी दरम्यान मुख्यमंत्री म्हणाले, ‘कुछ नही होता यार’ हे अजिबात चालणार नाही केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई: प्रतिनिधी कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्ह्णून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाचा वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन …

Read More »

त्या चर्चेवर चंद्रकांत पाटील म्हणाले, पाटील काय चीज आहे माहित नाही ४२ वर्षे झाली राजकारणात थोडी नाहीत

पुणे: प्रतिनिधी मागील काही महिन्यांपासून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्ली दौऱ्यावर गेले की त्यांची गच्छंती अटळ असल्याच्या चर्चेला सुरुवात होते. या पार्श्वभूमीवर आज दिल्ली दौऱ्यावरून परतल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषेदेला सामोरे जाणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, त्या सूत्रांच हिंमत असेल तर नाव सांगा, त्यांना …

Read More »