कर्नाटकातील निवडणूकीत भाजपाचा दारूण पराभव झाल्यानंतर विरोधकांचा आत्मविश्वास वाढला आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची आज पुन्हा भेट झाली. २४ फेब्रुवारीला अरविंद केजरीवाल मुंबई दौऱ्यावर आले होते. तेव्हाही त्यांनी ठाकरे कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यानंतर, लागलीच तीन, …
Read More »संजय राऊत यांच्यावर त्या वक्तव्यावरून गुन्हा दाखल ? पोलिसांकडून तपास सुरु सकाळीच्या पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावरून नाशिकमध्ये गुन्हा दाखल
राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकल्यापासून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर टीका करत आरोपही करत असतात तर कधी स्वतःवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तरही देतात. बऱ्याचदा ते सकाळी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न करताना दिसतात. परंतु अशाच एका पत्रकार …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमची मते आहे तशीच, फक्त पाच टक्के मते… वाटलं होतं कल आम्ही तोडू
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि जनता दल ( धर्मनिपेक्षक ) यांचा धुव्वा उडवत काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला. विधानसभेच्या २२४ जागांपैकी तब्बल १३५ पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत काँग्रेसने कर्नाटकाची सत्ता काबीज केली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावर नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, आमची फक्त ५ टक्के मते …
Read More »राहुल गांधी म्हणाले, नफरत की दुकान बंद, प्रेम की दुकान शुरूः ती आश्वासने लगेच… काँग्रेसचा बहुमताचा आकडा पार करताना राहुल गांधी यांची घोषणा
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३७ जागांवर आघाडी घेतल्यानंतर देशभरातील काँग्रेसजनांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमवीर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील आनंद व्यक्त करत म्हणाले, नफरत की दुकान बंद प्रेम की दुकान शुरू असे सांगत काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जी पाच आश्वासने दिली होती, ती पहिल्या कॅबिनेटमध्ये पूर्ण करू, अशी …
Read More »जयंत पाटील यांची खोचक टीका,…गैरवापर करणाऱ्यांवरच बजरंगबलीनेच गदा फिरवली कर्नाटकातील निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका
बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या लोकांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटकमध्ये भाजपाला झालेल्या दारुण पराभवावर ट्वीट करत जोरदार टीका केली. यावेळी जयंत पाटील म्हणाले, कर्नाटक हे देशातील एक अत्यंत प्रगतिशील राज्य आहे. या राज्यातील जनतेने आज सत्ताधारी भाजपाच्या विरोधात कौल देऊन बहुमताने काँग्रेसला सत्तेत …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आता प्रशासनच जनतेच्या दारी जाणार 'शासन आपल्या दारी' अभियान अधिक व्यापक करणार
शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (मरळी) येथे करण्यात आला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. दौलतनगर येथील श्रीमती विजयादेवी …
Read More »दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट…निकालानंतर नाना पटोले यांची भाजपावर टीका आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही कर्नाटक प्रमाणे भाजपचा सफाया होणार
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने देशाच्या राजकारणाची दिशा बदलली असून त्याचे प्रतिबिंब आज कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतून दिसले आहे. दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट या भ्रष्ट डबल इंजिनला हरवून कर्नाटकच्या जनतेने धर्मांध, हुकुमशाही वृत्तीला सपशेल नाकारून सर्वसमावेशक लोकशाही मानणा-या काँग्रेस पक्षाला बहुमताने विजयी केले आहे. आगामी लोकसभा आणि …
Read More »पराभव नको म्हणून काँग्रेस मध्ये गेलेला नेता आणि विद्यमान १३ मंत्री अखेर पराभूतच भाजपाला ५० हून अधिक जागी पराभव
लोकसभा निवडणूकीला आणखी वर्ष राहिलेला असला तरी देशातील संपूर्ण राजकारणाचा मूड सेट करणाऱ्या कर्नाटक विधानसभेची निवडणूकीचा निकाल आज जाहिर झाला. या निवडणूकीत भाजपाचा दारूण पराभव करत काँग्रेसने १३६ ठिकाणी विजय मिळवित एकहाती सत्ता हस्तगत केली. निवडणूकीच्या आधीच बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार चांगलेच बदनाम झाले. त्यामुळे भाजपाच्या विद्यमान सरकारमधील …
Read More »‘बजरंगा’ ची भलामण करणाऱ्यांना कर्नाटकी हिसकाः जाणून घ्या मतांची टक्केवारी भाजपा ६४ वर गारद तर काँग्रेसची १३६ वर विजय, जेडीएस अवघ्या २० जागांवर समाधानी
देशाच्या सार्वत्रिक निवडणूकीला अवघा एक वर्ष राहिलेला असताना कर्नाटक विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणूकीची मतमोजणी सकाळी सुरु झाली. सकाळपासूनच कर्नाटकातील २२४ पैकी ११६ ठिकाणी काँग्रेसने आघाडी घेतल्याचे तर ७० जागांच्या आसपास भाजपा आणि २७ जागांवर जेडीएस या पक्षाची आघाडी असल्याचे केंद्रिय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सांगण्यात येत होते. …
Read More »नाना पटोले यांची स्पष्टोक्ती, अजित पवार खोटे बोलतायत… आदेश आल्यानंतर मी, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात तिघे भेटलो
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लक्ष्य केलं. नाना पटोलेंनी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजीनाम्याची माहिती दिली, असा आरोप अजित पवारांनी केला आहे. त्याला नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिले. प्रतोद नेमण्यापासून …
Read More »
Marathi e-Batmya