राजकारण

जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरणासाठी महिन्याभरात धोरण तयार करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

राज्यातील आठ जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरण आणि आधुनिकीकरणासाठी जलसंपदा विभाग आणि महानिर्मिती कंपनीने संयुक्तरित्या महिन्याभरात धोरण तयार करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभागाचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महानिर्मिती कंपनीद्वारे नवीन जलविद्युत प्रकल्प उभारणे, जुन्या जलविद्युत प्रकल्पाचा पुनर्विकास करण्याबाबत आयोजित …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, ‘सारथी’च्या उपक्रमांसाठी शासन सर्वतोपरी मदत करणार

‘सारथी’च्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून विभागातील मराठा व मराठा -कुणबी समाजातील तरूणांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून तरूणांचे भविष्य घडविण्याऱ्या ‘सारथी’ला शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. छत्रपती शाहू महाराज, संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ‘सारथी’ पुणे या संस्थेच्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी …

Read More »

भाजपाचे आव्हान,.. तर उध्दव ठाकरे यांचा उमेदवार पळ काढेल

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लेखी पत्राद्वारे केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे तसे आवाहन केले. त्याचा विचार करून भाजपाने सहानुभूती म्हणून आपला उमेदवार मागे घेतला …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, देशभक्त मुस्लिम बांधव…एकत्र काम करू मराठी मुस्लिम सेवा संघाचा शिवसेनेला पाठिंबा

शिवसेनेतील फुटीनंतर विविध राजकिय पक्ष आणि सामजिक संघटनांकडून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना भेटून शिवसेनेला पाठिंबा देण्यात येत आहे. तसेच आगामी काळातही शिवसेनेसोबत राहण्याचे ग्वाही या संघटनांकडून देण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुस्लिम सेवा संघाने आज मातोश्री या निवासस्थानी उध्दव ठाकरे यांना भेटून शिवसेनेला पाठिंबा दिला. यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिक्षण संस्थांचे महत्वपूर्ण योगदान शिक्षकांनी दर्जेदार शिक्षणाद्वारे आदर्श पिढी घडविण्याचे काम करावे

शिक्षण हा शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून राज्याच्या शिक्षण विभागाचे काम पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने सुरू आहे. शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षकांनी देखील दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांची आदर्श पिढी घडविण्याचे काम करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर निकषांची पूर्तता करणाऱ्या सर्व माध्यमांच्या …

Read More »

संजय राऊत, अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगातच दोघांचाही जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत आज पीएमएलए न्यायालयाने कोठडीत वाढ केली. राऊत यांना २ नोव्हेंबर पर्यंत कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कथित १०० कोटी वसूली प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मिळाला. मात्र सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन देण्यास पीएमएलए न्यायालयाने …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि दिवाळी सणाच्या अनुषंगाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. यातील बहुतांष निर्णय हे राज्यातील नागरिकांना आपलेसे करण्यासाठी घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. यातील सगळ्यात मोठा निर्णय हा नोकरभरतीतील परिक्षेसाठीचा आहे. त्यानंतर सध्या मुदत पूर्ण केलेल्या गाड्याच्याबाबत, आंदोलकांवरील खटले मागे …

Read More »

गाड्यांचे ऐच्छिकरित्या स्क्रॅपिंग करणाऱ्यांना व्याज व दंड माफ

ऐच्छिकरित्या वाहनांचे स्क्रॅपिंग करणाऱ्यांना व्याज व दंड माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे भंगार स्थितीतील वाहनांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा देणाऱ्यांमार्फत स्क्रॅप करण्यात येणाऱ्या वाहनांचा थकीत असणारा मूळ मोटार वाहन कर वसूल करून त्यावरील व्याज …

Read More »

भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकरी आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासाः कर्जमाफ भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ९६४ कोटींची कर्जमाफी

भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या ३४,७८८ कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा तसेच ही रक्कम भूविकास बँकेकडून शासनास येणे असलेल्या रकमेमध्ये समायोजित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ६९ हजार हेक्टर शेतजमिनीवरील भूविकास बँकांच्या …

Read More »

राज्य सरकारच्या ७५ हजार रिक्त जागांसाठी या दोन संस्था घेणार परिक्षा

मागील अनेक वर्षापासून राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये रिक्त असलेल्या एक लाख ५० हजार जागांपैकी ७५ हजार भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या रिक्त जागा भरण्यासाठी घेण्यात येणारी परिक्षा एमकेसीएल मार्फत घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीने सरकारने घेतला होता. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारने आता या ७५ हजार जागांसाठी दोन संस्थांची नेमणूक कऱण्याचा …

Read More »