राजकारण

शरद पवार म्हणाले, तेंडूलकरला स्टेडियम बांधायला सांगितले तर…. आशिष शेलार यांना दिलेल्या पाठिंब्यावरून पवारांनी केला खुलासा

नुकत्याच झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपा आमदार आशिष शेलार यांना पाठिंबा देत त्यांना अध्यक्ष पदी निवडूणही आणले. विशेष म्हणजे या निवडणूकीत माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा पराभव झाला. एमसीएच्या निवडणूकीत या युतीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीवर सूचक शब्दात आरोप …

Read More »

बच्चू कडू यांनी दिली रवी राणा यांना १ नोव्हेंबरपर्यतची मुदत

एकनाथ शिंदे समर्थक प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू आणि भाजपा समर्थक आमदार रवी राणा यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. बच्चू कडू यांनी आज रवी राणा यांना आव्हान देत केलेल्या १ नोव्हेंबर पर्यत केलेल्या आरोपानुसार पुरावे द्या अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा असा इशारा दिला. त्यामुळे आगामी काळात बच्चू कडू …

Read More »

संजय शिरसाट म्हणाले, १५ मिनिटात दुष्काळ पाहणी दौरा यासारखं आश्चर्य नाही… दौऱ्यावरून उध्दव ठाकरेंवर केली टीका

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला. उध्दव ठाकरे यांनी औरंगाबादेतील पेंढापूर आणि दहेगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दर हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी …

Read More »

एकनाथ खडसे म्हणाले, राजकियदृष्ट्या संपविण्यासाठीच भूखंड प्रकरण

भोसरी भूखंड प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबाबत पुणे न्यायालयाने संशय व्यक्त करत एकनाथ खडसे यांना अटक करण्यापासून मज्जाव केला. तसेच नव्याने फेर चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज मुक्ताई नगर येथे पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीष महाजन यांचे नाव न …

Read More »

डॉ नीलम गोर्‍हे म्हणाल्या, उध्दव ठाकरेंचे नेतृत्व देशस्तरीय

शेतकर्‍यांची जी परवड झाली आहे. अवकाळी पावसाने जी शेतकर्‍यांची नुकसाने झाली आहेत. दुष्काळात तेरावा महिना आला की काय अशी परिस्थिति शेतकर्‍यांची झाली आहे. अनेक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या घडत आहेत. शेतीला आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना पुरेशी मदत शासनाकडून मिळत नाही. यामुळे ते हवालदिल झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर आज २३ ऑक्टोबर २०२२ …

Read More »

आनंदाचा शिधाचे वितरण आता ऑफलाईन पध्दतीने अन्न, नागरी व पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती

महाराष्ट्रातील प्राधान्य कुटूंब व अंत्योदय अन्न योजनेतील पात्र सुमारे १ कोटी ६२ लाख शिधावाटप पत्रिका लाभार्थींमधील सुमारे ७ कोटी नागरिकांना दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणा-या आनंदाचा शिधा या शिधासंचाचे वितरण आजपासून ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता १ किलो साखर, १ किलो रवा, १ …

Read More »

उध्दव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा, शिवसेनेशी गद्दारी केलात शेतकऱ्यांशी नको औरंगाबादेतील दौऱ्यात उध्दव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

राज्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला हातचा घास गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज रविवारी औरंगाबादेतील शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्याशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची …

Read More »

ठाकरे यांच्या दौऱ्यावरून अब्दुल सत्तारांची टीका, शेतकऱ्यांसाठी फक्त २४ मिनिटे

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे आज रविवारी औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीही घेणार आहेत. या दौऱ्यावरून भाजपाने त्यांच्यावर टीका केलेली असताना, आता राज्याचे कृषीमंत्री तथा शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनीही निशाणा साधला. मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, मी …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, हातातला आसूड सरकारला घाम फोडण्यासाठी वापरा औरंगाबादेतील दहेगाव, पेंढापूर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर उध्दव ठाकरे

ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच राज्य सरकारकडूनही तातडीने मदत उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे दिवाळीच्या सणातही शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंनी भरलेले आहेत. या शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आज रविवारी औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबादमधील दहेगावात जाऊन …

Read More »

नारायण राणे म्हणाले, ते माझे सहकारी होते, पण तेव्हा असे नव्हते उध्दव ठाकरे यांच्यावर साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या १० लाख पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नारायण राणे सुद्धा दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर नारायण राणेंनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. पंतप्रधान मोदी तरुण-तरुणींना नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत होते. त्यातील १० लाख नोकऱ्यांचा …

Read More »