राजकारण

अजित पवार यांचे आव्हान, ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊ द्या देशात चित्ते आले ठिक आहे परंतु यातून लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का?

तुमच्या – माझ्या देशात व महाराष्ट्रात जे महागाईचे, बेरोजगारीचे व कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत त्यांना व्यवस्थितपणे बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणले जातात. आता देशात चित्ते आले ठिक आहे. ते वाढावेत, पशूधन वाढावे हे ही ठीक आहे. परंतु यातून लोकांच्या रोजी-रोटीचा प्रश्न सुटणार आहे का? वेदांताचे काय होणार आहे …

Read More »

नाना पटोले म्हणाले, भाजपाचा तो दावा खोटा… देवेंद्र फडणवीस, तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात का गुजरातचे ?

राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत भारतीय जनता पक्ष खोटी माहिती देऊन विजयाचा दावा करत आहे तो चुकीचा आहे. काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना या निवडणुकीत घवघवीत मिळाले असून काँग्रेस पक्षाला १७५ ग्रामपंचायतींमध्ये घवघवीत विजय मिळाला आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी …

Read More »

मराठा आरक्षणासाठी भाजपा-शिंदे गटाच्या प्रत्येकी तीन जणांची मंत्रिमंडळ उपसमिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मान्यता

मुंबई उच्च न्यायालयात गेलेले मराठा समाजाचे आरक्षण परत मिळविण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकारने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची आज स्थापना केली. या समितीत 6 मंत्ऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या उपसमितीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे या समितीत भाजपा आणि शिंदे गटाच्या …

Read More »

अंबादास दानवे यांचा निशाणा, “शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र” ही मुख्यमंत्र्यांची घोषणा…

राज्यात शेतकऱ्यांच्या मोठया प्रमाणात आत्महत्या होत आहेत ही विघातक परिस्थिती आहे. राज्याला “शेतकरी आत्महत्यामुक्त करु” हे मुख्यमंत्र्यांनी दिलेले अभिवचन घोषणेत विरले अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. विदर्भ दौऱ्यावर असताना आज यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीनंतर ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. अतिवृष्टीमुळे …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, सडके खामोश हो गई तो संसद आवारा हो जाएगी ओबीसींच २७ टक्के आरक्षण कायम राहण्यासाठी आपला लढा सुरु राहील

राज्यातील ओबीसी समाजाने काही दिवसांपुर्वीच एक मोठी लढाई यशस्वीपणे लढली आणि विजय मिळवला. आपल्या हक्काचे असलेले राजकीय आरक्षण गेले होते. मात्र ते पुर्ववत करण्यास आपल्याला यश आले आणि राज्यात बहुसंख्य असलेल्या ओबीसींना न्याय मिळाला. आपली लढाई ही इथेच संपत नाही. आपल्याला अजुन लढायच आहे. काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच आरक्षण …

Read More »

सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा, गांधी जयंतीपासून ‘हॅलो ऐवजी वंदे मातरम’ सेवाग्राम येथून होणार वंदे मातरम् अभियानाचा शुभारंभ

जनाजनात आणि मनामनांत राष्ट्रभक्ती जागृत व्हावी यादृष्टीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून त्याच दिवशी ‘हॅलो ऐवजी वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ करण्यात येईल; या अभियानात राज्यातील जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले केले. राज्य सांस्कृतिक …

Read More »

राहुल गांधी यांच्यासाठी प्रदेश काँग्रेसने केले ‘हे’ दोन ठराव मंजूर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत दोन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी (AICC delegate) यांच्या निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्याचा ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे …

Read More »

भाजपाचा दावा, ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हीच नंबर वन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भाजपा – शिवसेना युतीला स्पष्ट कौल दिला असून ५८१ पैकी २९९ ग्रामपंचायतींमध्ये युतीचे सरपंच निवडून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जनतेने या निकालाद्वारे विश्वास व्यक्त केला असून आपण दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुढच्या अधिवेशनात सिंचन प्रकल्पांसाठी निधी

पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणि दुष्काळी भागासाठी असलेल्या बळीराजा जलसंजीवनी या केंद्र अर्थसहाय्यीत योजनांबरोबर राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती द्यावी. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या. यामुळे आता केंद्र सहाय्यीत सिंचन योजनांसह राज्यातील सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी मिळणार आहे. सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री …

Read More »

छात्र भारतीचे आव्हान: अनिल बोंडेंच्या घरासमोर आंतरधर्मीय विवाह लावणार छात्र भारतीचे राज्यध्यक्ष रोहित ढाले यांची घोषणा

भाजपाचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी आंतरधर्मीय विवाहाविरोधात खाजगी विधेयक मांडणार असल्याचे मत व्यक्त केले. सर्वच आंतरधर्मीय विवाह हे फसवून, धमकावून होत नाहीत हे ठणकावून सांगण्यासाठी येणाऱ्या काळात अनिल बोंडे यांच्या घरासामोरच छात्रभारती आंतरधर्मीय विवाह लावून देणार असल्याचे छात्रभारतीचे राज्याध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले. मुलींना प्रलोभने देऊन, गिफ्ट देऊन धमक्या …

Read More »