राजकारण

एमपीएससीच्या कक्षेतील १०० टक्के व कक्षेबाहेरील ५० टक्के पदभरती होणार राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांची माहिती

राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील १०० टक्के पदभरती करणार तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या कक्षेतील पदे वगळता ५० टक्के पदे भरण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली. शासनाच्या २९ प्रमुख विभागांमध्ये दोन लाख १९३ जागा रिक्त असल्याबाबतची लक्षवेधी विधानपरिषदेत सादर करण्यात आली. या …

Read More »

तो व्हिडिओ ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या; अमित शहाजी, शिंदे गटाच्या आमदारांना… मविआच्या आमदारांना धमकावणारा शिंदे गटाचा व्हिडीओ ट्वीटरवर केला शेअर

महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय वर्तन सत्ताधारी आमदारांनी केले असून महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था नीट राहण्यासाठी तुम्ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरात लवकर चर्चा करावी आणि आमदारांचे वर्तन लक्षात घेता शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करुन गृहमंत्री …

Read More »

सत्ताधारी आमदारांच्या धक्काबुक्कीने मदतीची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग आंदोलन करणे विरोधकांचा अधिकार, सत्ताधाऱ्यांचा विधानभवन परिसरातील प्रकार दुर्दैवी-बाळासाहेब थोरात

अधिवेशनातून आपल्यासाठी काही मदतीचा हात देणारा निर्णय होईल अशी आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, दररोज ३ शेतकरी आत्महत्या करत आहेत तर मुख्यमंत्री शेतकऱ्यांना भावनिक आवाहन करत आहे आणि विधीमंडळाच्या पायऱ्यावर मात्र सत्ताधारी आमदार विरोधकांना धक्काबुक्की करतानाचे चित्र पाहिल्यानंतर शेतकरी व …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची माहिती, राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती विधानसभेत दिली माहिती

राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभेत लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची …

Read More »

नाना पटोले म्हणाले, २०१४ पासून लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही कारभार महागाई, बेरोजगारीसह जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर केंद्र सरकार फेल

लोकशाही व संविधानाच्या तत्वांवर देशात आजपर्यंत सरकारे काम करत होती परंतु २०१४ पासून भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार हुकूशाही पद्धतीने काम करत आहे. २०१४ पासूनच देशात आणीबाणी सुरू असून विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी व विरोधी पक्ष फोडण्यासाठी भाजपा ईडी, सीबीआय, आयकर सारख्या यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे पुन्हा-पुन्हा स्पष्ट होत आहे, असा …

Read More »

शिंदे गटाचे सुहास कांदे म्हणाले फडणवीस यांना, आम्ही त्या गोष्टीसाठी तुमच्यासोबत आलो अन… विधानसभेतच धरला आग्रह, भुजबळांची केस रिओपन करा

विधानसभेत एकनाथ शिंदे समर्थक आमदार सुहास कांदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री (छगन भुजबळ) यांनी घोटाळा केल्याचे आरोपपत्रात लिहिलेले असतानाही आणि त्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्याविषयीचा पत्रक काढलेले असतानाही त्या मंत्र्याच्या विरोधात अपील का केले नाही? असा सवाल करत त्या मंत्र्यांच्या विरोधात अपील करणार असे जाहिर …

Read More »

शरद पवार यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा, एकिकडे महिलांच्या सन्मानाविषयी बोलयचं अन… बिल्कीस बानो प्रकरणावरून केली टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुजरातमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना सोडून देण्याच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलीच टीका केली. नवी दिल्लीत आज आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार म्हणाले, एकीकडे महिलांच्या सन्मानाविषयी बोलायचं आणि दोन दिवसांनी गुजरात सरकार एका महिलेवर बलात्कार करणाऱ्यांना सोडून देतं. …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करत ‘या’ मागणीवरून विरोधी पक्षाचा सभात्याग… महाविकास आघाडीने शेतकऱ्यांसाठी केलेल्या मागण्यांकडे सरकारने केले दुर्लक्ष...

शिंदे-फडणवीस सरकारने आज ओला दुष्काळ जाहीर करायला हवा होता…शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये आणि फळबागांना हेक्टरी दीड लाखाची मदत द्यायला हवी होती याशिवाय इतर मागण्यांकडेही दुर्लक्ष केल्यामुळे सरकारचा निषेध करत असल्याचे सांगून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज सभात्याग केला. अतिवृष्टीमुळे शेतजमिनीवरील १८ लाख हेक्टर क्षेत्र …

Read More »

विधान भवन पासून हाकेच्या अंतरावर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला मात्र १५ टक्के भाजला

विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू असताना सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असताना विधान भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आयनॉक्स थिएटर समोर उस्मानाबादचे सुभाष भानुदास देशमुख या शेतकऱ्याने अंगावर रॉकेल टाकत स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवत देशमुख यांना जवळच्या …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, २५ हजार कोटींच्या मागण्या पण शेतकऱ्यांसाठी दमडी नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शिंदे-फडणवीस सरकारचे दुर्लक्ष

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे परंतु एकनाथ शिंदे- फडणवीस सरकार मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांसाठी केवळ मदत जाहीर केली तीसुद्धा तुटपुंजी आहे. २५ हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यास आल्या पण त्यात शेतकऱ्यांसाठी दमडीची तरदूत केली नाही हे अत्यंत …

Read More »