पत्रावाला चाळ प्रकरणी सध्या शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत हे ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ऐरवी त्यांचा दिवस राजकिय घडामोडी आणि वक्तव्यात जातो. मात्र संजय राऊत यांना तुरूंगात गेल्यानंतर त्यांचा दिवस कसा जात असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे आपच्या मराठी ई-बातम्या.कॉमच्या प्रतिनिधीने याविषयीचा कानोसा घेतला असता संजय राऊत …
Read More »प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शिंदे गट आणि आमचे… सांगितली भविष्यकालीन योजना
राज्यात सत्तांतर होताच भाजपामध्येही आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला असून मागील काही काळापासून चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून नारळ देत भाजपाच्या दिल्लीतील श्रेष्ठींनी महाराष्ट्रातील ओबीसी चेहरा असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपविली आहे. तर दुसऱ्याबाजूला मुंबईच्या अध्यक्ष पदावरून मंगलप्रभात लोढा यांना हटवून त्यांच्या ठिकाणी आशिष …
Read More »दादरमध्ये एकनाथ शिंदे गटाकडून प्रती सेनाभवन शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर यांची माहिती
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये आता शिवसेनेत बंडाचे निशाण फडकाविलेल्या एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना भवनच्या धर्तीवर प्रति सेना भवन उभारण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे मुळ शिवसेना भवनला हा प्रती सेना भवनाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्न करण्यात येत आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर हे एका वृत्तवाहीनीशी बोलत होते. त्यावेळी …
Read More »थेट सरपंच पदाच्या निवडणूकीसह ‘या’ ग्रामपंचायतीसाठी १८ सप्टेंबरला मतदान ६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान
पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १९ सप्टेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. …
Read More »नाना पटोले म्हणाले, ‘हर घर तिरंगा’ अभियानात भाजपाकडून तिरंग्याचा अपमान भाजपाच्या विरोधात बोलणाऱ्यांवरच कारवाईचा बडगा
जुलमी ब्रिटिशांच्या जोखडातून देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यानंतर देश लोकशाही व संविधानाच्या मार्गाने चालत होता पण मागील आठ वर्षापासून लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे. ब्रिटिश राजवटीत ज्याप्रमाणे सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात त्याच पद्धतीने आज भाजपा सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे आणि जे भाजपाबरोबर जातील …
Read More »नाराज पंकजा मुंडेंच्या नाराजीवर गिरिष महाजन म्हणाले, एक तासापूर्वी फोन केला… मोठी जबाबदारी मिळेल
राज्यातील सत्तांतरानंतर तब्बल ४० दिवसानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, भाजपात संधी न मिळाल्याने काही नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण दिसत आहे. त्यातच विधान परिषदेच्या निवडणूकीत, राज्यसभेच्या निवडणूकीत आणि राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे यांनी कदाचित माझी पात्रता नसेल असे वक्तव्य करत …
Read More »भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी केली नेमणूक
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. तसेच त्यांनी मुंबई भाजपा अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मंत्री तथा मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे व आशिष शेलार यांचे अभिनंदन केले व त्यांना …
Read More »दिपक केसरकर म्हणाले, चित्रा वाघ म्हणत असतील तर आणखी चौकशी होईल मंत्री संजय राठोड यांच्या मागणीवरून केला खुलासा
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या विस्तारात १८ जणांचा समावेश करण्यात आला. परंतु या १८ मध्ये पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या संजय राठोड यांचा समावेश करण्यात आल्याने भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली. या टीकेवरून आता शिंदे गटाचे मंत्री …
Read More »अमोल मिटकरी यांचा रवि राणा यांना टोला, देवेंद्र चालिसा म्हणा… राज्य मंत्रिमंडळातील सहभागावरून लगावला टोला
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालिसावरून रान पेटविणारे रवि राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांचे भाजपाबरोबरील सख्य काही लपून राहिले नाही. तसेच हनुमान चालिसावरून उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला जेरीस आणणाऱ्या रवि राणा यांचा या नव्या सरकारमध्ये समावेश होईल असे सांगण्यात येत असताना पहिल्या …
Read More »पालकमंत्री, खाते वाटप रखडणार, १५ ऑगस्टला कोणता मंत्री कोठे झेंडा फडकाविणार? मुख्यमंत्री कार्यालयाकडून सर्वांना आदेश जारी
विरोधकांच्या सततच्या टीकेला घाबरून अखेर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने अखेर राज्य मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तार केला. या मंत्रिमंडळ विस्तारात २० जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. मात्र मंत्रिमंडळ विस्तार करूनही दोन दिवस होत आले तरी कोणाला कोणते खाते द्यायचे आणि कोणाला कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री नेमायचा याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »
Marathi e-Batmya