पंकजा मुंडे या दोन दिवसपण सत्तेपासून दूर राहू शकत नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची खोचक टीका

 मुंबई : प्रतिनिधी

धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयाची पायरी चढणार नाही म्हणणाऱ्या भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी आज घुमजाव केले आहे. त्यांना दोन दिवसपण सत्तेपासून दूर राहता येत नाही. यांचा हा खेळ सत्तेसाठी असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

महाराष्ट्राच्या मंत्री पंकजा मुंडे या दोन दिवसापूर्वी धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयाची पायरी चढणार नाही अशा सांगत होत्या आणि आता त्यांनी घुमजाव केले आहे. आज त्या मंत्रालयात आल्या त्यावेळी लोकांनी विचारले असता मी २०१९ला सत्ता मिळणार नाही असे म्हणाल्या असे स्पष्ट केले. म्हणजे याचा अर्थ या दोन दिवसपण सत्तेपासून हे दूर राहू शकत नाही. ही परिस्थिती आज आहे. यांचा हा खेळ सत्तेसाठीच असल्याचा आरोप त्यांनी केला.

 राज्यात जेव्हा कधी निवडणूका होतील, त्यावेळी लोकसभेत आणि विधानसभेत भाजपाला धनगर समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांचा टोला, तुम्हाला १२ वर्षात जे करता आलं नाही, ते आम्ही तुमच्या आधी केलं सत्ताधाऱ्यांना टोले लागवत आणि चिमटे काढत जयंत पाटील यांनी कर्जमाफी योजनेची हवाच काढली !

२०१४ पर्यंत तत्कालीन राज्य शासनाने तिजोरीतून एकदाही कर्जमाफी केली नाही असे सत्ताधारी म्हणतात. २००८ मध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *