पंतप्रधानाचे आवाहन, २२ मार्चला घराबाहेर पडू नका जनता कर्फ्यु लागू राहणार

नवी दिल्लीः विशेष प्रतिनिधी
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावाला रोखण्यासाठी २२ मार्च २०२० रोजी संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यु लागू करण्यात येणार आहे. यादिवशी नागरीकांनी सकाळी ७ ते रात्रो ९ वाजेपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
जनतेला उद्देशून केलेल्या भाषणा दरम्यान त्यांनी वरील आवाहन केले.
त्याचबरोबर त्यादिवशी संध्याकाळी ५ वाजता जनतेने त्यांच्या घराच्या गॅलरीत, खिडकीत उभे राहून दररोज पेपर-दूध पुरवठा करणारे, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी टाळ्या, घंटा वाजवावे असे आवाहन करत यानिमित्ताने परदेशात असलेल्या नागरीकांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनामुळे देशातील आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असून याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. या फोर्सकडून आर्थिक नुकसानीचा आढावा घेवून त्यावर उपाययोजना तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या आजारावर औषध नसल्याने या आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी संकल्प आणि संयम ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करत गर्दी करणे, कार्यक्रमाला जाणे आदी गोष्टी करण्याचे टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.

About Editor

Check Also

अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार अंबाझरी तलावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी

नागपूरचे वैभव म्हणून अंबाझरी तलावाकडे पाहिले जाते. पाण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा नागनदीवरील धरण किंवा साठवण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *