शरद पवार यांनी सांगितला आर आर पाटील यांच्या राजकिय प्रवेशाचा किस्सा

देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. एक वेगळी विचारधारा देशात निर्माण झाली आहे. ज्यांना स्वातंत्र्य चळवळशी देणे घेणे नाही, त्यांचा हातात देशाची सत्ता आहेत. त्यांचे नाव नरेंद्र मोदी आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे.
सांगलीचे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची सभा पार पडली आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार , खासदार संजय राऊत, रोहित आर.आर. पाटील, सुमनताई पाटील आदी नेते उपस्थित होते. यावेळी भाषणामध्ये बोलताना शरद पवार यांनी स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांनी आबांच्या राजकीय एन्ट्रीचा खास किस्साही सांगितला.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आर .आर .आबा म्हणजे सर्व सामान्यातील कुटुंबातील व्यक्ती, प्रामणिक काम करण्याची वृत्ती. मला आठवतयं एक दिवस सांगलीला आलो होतो. तिथे विद्यार्थ्यांची एक सभा होती. या सभेमध्ये भाषण करायला अनेक तरुण उभे राहिले. या तरुणांमध्ये एक तरुण बोलायला उभा राहिला. त्याने अतिशय चांगलं भाषण केले. मी चौकशी केली. भारी गडी दिसतोय, लक्ष ठेवलं पाहिजे. ते दुसरे कोणी नव्हते, आर. आर .पाटील होते असे सांगितले.

शेवटी बोलताना शरद पवार म्हणाले की, तसेच नंतरच्या काळात पक्षसंघटनेत आले. जिल्हा परिषदेत गेले. सांगलीची जिल्हा परिषद त्यांनी गाजवली. त्यानंतर त्यांना सांगलीच्या लोकांनी, तासगावच्या लोकांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं आणि महाराष्ट्राला एक कर्तुत्ववान लोकांचे प्रश्न जाणणारा नेता मिळाला. सांगलीने कर्तृत्ववान माणसं दिली. एक आर. आर. पाटील आणि दुसरे जयंत पाटील. आज रोहित पाटील आर. आर. पाटील यांचा वारसा चालवत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे असेही सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पंतप्रधान मोदी पनौती तर मुख्यमंत्री फडणवीस खोटारडे, पेट्रोल डिझेल आहे तर पंपावर रांगा कशासाठी ? पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचे दादरमध्ये मोठे आंदोलन व रास्ता रोको

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी LPG व सीएनजी मध्ये भरमसाठ दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *