बारामतीच्या टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना रोखले… व्हायरल व्हिडिओवरून लोकसभेनंतर विधानसभा निवडणूकीत पवार कुंटुबिय आमने-सामने

महाराष्ट्रातील निवडणूकीच्या निमित्ताने सर्वाधिक चर्चा ही बारामतीतील मतदारसंघाची होते. त्यातच अजित पवार यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाच्या विरोधात भूमिका घेत भाजपासोबत गेल्याने त्यात आता आणखीनच भर पडली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने पवार कुटुंबिय आमने-सामने आले होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोरा-समोर आले. या पार्श्वभूमीवर बारामतीतील बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये खरेदी करण्यासाठी गेलेल्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांना या पार्कमध्ये प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात आल्याचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. त्यावरून विविध तर्क वितर्कांना उधाण आले.

बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी त्यांचे नातू युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली. तसेच युगेंद्र पवार यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते आतापर्यंतच्या प्रचारात शरद पवार जवळपास सर्व ठिकाणी युगेंद्र पवार यांच्यासोबत आहेत. तसेच युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार याही स्वतः फिरत आहेत.

यावरून काही दिवसांपूर्वी बारामतीतील प्रचारा दरम्यान अजित पवार म्हणाले की, प्रतिभा काकींना काय झाले ते कळत नाही. मुला सारख्या पुतण्याच्या प्रचारासाठी प्रतिभा काकी कधी आल्या नाहीत. मात्र आता नातवाचा इतका काय पुळका आलाय की ते त्याच्या प्रचारासाठी घरोघरी फिरत आहेत. निवडणूक झाल्यानंतर प्रतिभा काकींना मी विचारणार असल्याचेही सांगितले.

त्यातच बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये खरेदी करण्यासाठी गेलेल्या प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या रेवती सुळे यांना पार्कच्या गेटवरच अ़़डवले. यासंदर्भात या दोघींनी प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकाला विचारत होत्या की, गेट उघड आम्हाला खरेदी करायचीय, पण प्रवेशद्वारावर असलेल्या वॉचमनने सांगितले की, अंदरसे फोन आया गेट बंद करो. त्यावर असे करण्यास कोणी सांगितले असे विचारताच वॉचमन म्हणाला की, सीईओ दिलीप वाघ यांचा आदेश आला, त्यामुळे मी गेट बंद केले.

या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बारामतीतील बारामती टेक्सटाईल पार्क शरद पवार यांच्या प्रयत्नाने सुरु झाले. आता याच टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यासाठी शरद पवार यांच्या पत्नीला अर्धा तास रोखून ठेवले हे दुर्दैवी असल्याचे मत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *