शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश, ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ उभारणीस गती द्या; गुणवत्तेत तडजोड नको डॉ बाबासाहेब बेडकर यांचा ७५ फुटाचा पुतळा उभारणार

लातूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य ७५ फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ (Statue of Knowledge) पुतळ्याच्या उभारणीसंदर्भात आढावा बैठक शासकीय विश्रामगृह, लातूर येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे बोलताना सांगितले की, या बैठकीत पुतळ्याच्या कामास लवकरात लवकर गती देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. “या महत्त्वाच्या प्रकल्पास आधीच विलंब झाला असून, आता कोणतीही दिरंगाई न करता काम पूर्ण करावे,” असे निर्देश दिले.

पुढे बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, या प्रकल्पासाठी आवश्यक अतिरिक्त निधी राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आला असून, पुढे आणखी निधीची आवश्यकता भासल्यास त्यासाठी स्वतः पाठपुरावा करणार असल्याची ग्वाहीही यावेळी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उभारणी अत्यंत दर्जेदार व देखणी व्हावी, यासाठी विशेषतः मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव, बारकावे आणि संपूर्ण शिल्पाची गुणवत्ता यावर विशेष लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी भंतेजी यांनी बैठकीत केली.

तसेच पुतळ्याच्या खालील स्ट्रक्चर (आधारभूत रचना) सध्याच्या आराखड्यानुसार लहान भासत असून ते अधिक भव्य आणि अनुरूप करण्यासाठी जागा वाढविण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला.

या संदर्भात प्रसिद्ध शिल्पकार अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन जागेची पाहणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी ठामपणे सांगितले की, “या स्मारकाच्या उभारणीत कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नाही. गुणवत्ता, भव्यता आणि ऐतिहासिक महत्त्व यांचा योग्य संगम साधत हे स्मारक उभारले जावे.”

बैठकीस लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती. मानसी मीना, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल मीना, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, भंते जी भिक्खू प्रज्ञानंद, लातूरच्या महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, नगरसेवक व संबंधित विभागाचे अधिकारी, तांत्रिक तज्ज्ञ तसेच मान्यवर उपस्थित होते.

About Editor

Check Also

चंद्रकांत पाटील यांची माहिती, ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’ अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रशिक्षण राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक आणि प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण अनिवार्य

अंमलबजावणीच्या दिशेने राज्यात महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील ‘ऑनर्स’ व ‘ऑनर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *