राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात ठाकरे आणि शिंदे गटाची न्यायालयात धाव

राज्यातील बहुचर्चित शिवसेनेतील आणि सत्ताकारणातील महत्वाच्या घटनांचा भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या याचिकेतील मागणीप्रमाणे १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यावा असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतरही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर शिवसेना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेल्या निरिक्षणाच्या विरोधात निकाल दिला. त्यामुळे ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांच्या निकालाच्या विरोधात पुन्हा एकदा याचिका दाखल करत शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रेबाबत आणि शिंदे गटाने ठाकरे गटाच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी पुन्हा एका केली.

शिदे गटाने ठाकरे गटाच्या आमदारांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याऐवजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून ठाकरे गटाच्या समर्थक आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी केली. तर ठाकरे गटाने यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वेळकाढूपण बद्दल निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत न्यायालयाला अपेक्षित दिलेल्या आदेशानुसार दोन्ही गटाच्या बाबत अंतिम निकाल दिलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

याप्रश्नी राहुल नार्वेकर यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया विचारण्यात आली असता ते म्हणाले की, मी कोणालाही संतुष्ट करण्यासाठी हा निकाल दिला नाही. कायद्याच्या अनुषंगाने निकाल दिला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अतिम निकाल दिला असल्याचेही स्पष्ट केले.

पुढे बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, राज्यघटनेतील तरतूदीनुसार कोणताही व्यक्ती न्यायालयात जाऊन दाद मागू शकतो. तसेच काही लोकांनी याचिका दाखल केली म्हणून माझा निर्णय रद्दबातल ठरू शकत नाही. त्यासाठी संबधित याचिकाकर्त्याला बेकायदा पध्दतीने आणि संविधानानुसार निकाल दिला नसल्याचे दाखवावे लागणार आहे. त्यानंतर मी दिलेला निकाल बदलला जाईल असेही सांगितले.

About Editor

Check Also

सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवतायंत- राज ठाकरे

ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *