उध्दव ठाकरे यांच्या त्या विधानावर मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार, ‘बेगानी शादी में अब्दुला..’ चा पलटवार पोट निव़डणूक निकालानंतर उध्दव ठाकरेंनी टीका करत आता कसबा बाहेर आलाय देशही बाहेर येईल टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

तुम्ही पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूकीत प्रचाराच्या निमित्ताने आम्हाला म्हणालात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारासाठी राज्याच्या इतिहासात रोड शो करण्याची घटना. पण तुम्हीही गल्लीबोळात फिरत होतात. तुमचे नेते शरद पवार हे ही छोट्या छोट्या मिटींगा घेत होते. ते ही गल्लीबोळातच फिरत होते ना असा खोचक टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला. तसेच यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या विधानाचाही खरपूस समाचार घेताना म्हणाले, बाकिच्यांच ठिक आहे. पण ज्यांच्या हातात पक्षही राहिला नाही ज्यांचा उमेदवारही नव्हता ते निकालावर आनंद साजरा करत होते. म्हणे आता भ्रमातून कसबा बाहेर आलाय देशही बाहेर येईल हे वक्तव्य म्हणजे बेगानी शादी मे अब्दुला दिवाना सारखी अवस्था असल्याचा खोचक टीकाही उध्दव ठाकरेंचे नाव न घेता केली.
अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील विधान केले.

कसब्यातील जागा जिंकले म्हणून तुम्ही सर्वांनी आनंद व्यक्त केलात. ती जागा काँग्रेसने जिंकली. त्यानंतर धनदांडग्याचा सर्वसामान्य जनतेने पराभूत केले अशी टीका केलात. पण त्याच सर्वसामान्य जनतेने तुम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये पराभूत केले आणि भाजपा-शिवसेनेच्या उमेदवार जगताप यांना विजयी केले याची आठवण करून देत काही जण तर बेगानी शादी मे अब्दुला दिवाना सारखे नाचत होते अशी खोचक टीका उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर केली.

उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कसबा पेठचा निकाल आल्यानंतर काही जण म्हणाले की कसबा आता बाहेर आलाय देश ही बाहेर येईल, आता यांना कोणी सांगाव की आता तर तुमचा पक्षही तुमच्या हातातून सुटला आहे. तुम्ही पहिल्यांदा त्या भ्रमातून या असा खोचक टोला लगावत आता तर ते कोणीच होऊ शकत नाहीत. तेवढ्यात विरोधी बाकावरून शिवसेना पक्ष प्रमुख होतील की अशी आठवण मुख्यमंत्र्यांना करून दिली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, अरे हा पण ते शिवसेना पक्ष प्रमुख कसे होतील आता तर शिवसेना आमच्या ताब्यात आहे, त्यामुळे ते ही होता येणार नसल्याचा गर्भित इशारा दिला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारातून तयार झालेल्या ‘वारी’वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान माहिती व जनसंपर्क विभागाद्वारे निर्मित ‘पंढरपूर वारी - इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ माहितीपटाला आंतरराष्ट्रीय बहुमान

पंढरपूर आषाढी वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत निर्मिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *