ठाकरे गटाच्या शिवगर्जना यात्रेला भाजपा-शिंदे गटाकडून आशिर्वाद यात्रेचे प्रत्युत्तर सहा लोकसभा क्षेत्रात होणार आशीर्वाद यात्रा-भाजपा नेते आशिष शेलार

मागील दोन-तीन दिवसांपासून ठाकरे गटाची शिवगर्जना यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या निमित्ताने ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे आदी राज्याच्या विविध भागात दौऱ्याच्या निमित्ताने भाजपा, शिंदे गटाच्या विरोधात जाहिर सभा घेत आहेत. यापार्श्वभूमी भाजपा या यात्रेला प्रत्युत्तर म्हणून रविवारपासुन मुंबईत सहा जिल्ह्यात भाजपा- शिवसेना (शिंदे गट)ची आशीर्वाद यात्रा सुरू होत असल्याची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज येथे दिली.

स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेवुन जात आहेत. भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून याच अनुषंगाने भाजपा आणि शिवसेना यांच्यावतीने मुंबईतील सहा लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा रविवारी (ता. ५) मार्च पासून सुरू होत आहे. दीड दोन तासांचा प्रवास करून प्रत्येक लोकसभेतील एका पावन प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेऊन यात्रा पुढे जाईल. अश्या सहा यात्रा संपन्न होतील अशी माहिती भाजपा नेते आ. ॲड. आशिष शेलार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, ५ मार्च, ९ आणि ११ मार्च रोजी प्रत्येकी दोन लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा होईल. त्यानंतर १४ मार्चला दादर येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘जाणता राजा’ महानाट्य होईल असेही ते म्हणाले.
तसेच ठाणे आणि मुंबईतील काही भागात छत्रपती शिवाजी महाराजांवरील जाणता राजा हे महानाट्यचे आयोजन करण्यात आले आहे.

About Editor

Check Also

एमपीएससी अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा माजी मंत्री आ. विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोर्चात सहभाग

एमपीएससी MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता, संशयास्पद मूल्यमापन, निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांविरोधात एमपीएससी MPSC अध्यक्ष व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *