या महिलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधानसभेत निवेदन

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार योजनेअंतर्गत महिला सबलीकरण, स्त्री शिक्षाम पददलितांचे शिक्षण, महिलांसाठी सामाजिक परिवर्तनाचे कार्य, स्त्रीभृणहत्या प्रतिबंधात्मक कार्य, वंचित क्षेत्रातील महिलांसाठी कार्य इत्यादी क्षेत्रात निरलसपणे कार्य करणाऱ्या राज्यातील ६ महसूल विभागातील प्रत्येकी एक या प्रमाणे ६ मान्यवर महिलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०२२-२३ या वर्षाचे पुरस्कार प्रदान करण्यासाठी शासनस्तरावरील निवड समितीच्या बैठकीत मान्यता दिल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून जाहीर केले.

  या महिलांना सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहिर

पुरस्कारप्राप्त महिलांमध्ये पुणे विभागातून जनाबाई सिताराम उगले, नाशिक- डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी, कोकण – फुलन जोतीराव शिंदे, छत्रपती संभाजीनगर-  मिनाक्षी दयानंद बिराजदार, अमरावती – वनिता रामचंद्र अंभोरे, नागपूर विभागातून शालिनी आनंद सक्सेना यांचा समावेश आहे. पुरस्कारप्राप्त महिलांना रुपये १ लाख आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

About Editor

Check Also

सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवतायंत- राज ठाकरे

ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *