१० वीचा निकाल जाहिरः उतीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण वाढले, १.९८ टक्क्याने वाढ विभागीय निकालात कोकण पहिला, तर नागपूरचा सर्वात कमी

राज्यातील १० वी परिक्षेचा निकाल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहिर केला. निकालात उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी १.९८ टक्क्याने निकाल वाढीव स्वरूपात लागला आहे. यंदाच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून ९९.१ टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूरचा अशून ९४.७३ टक्के निकाल लागल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पुढे बोलताना शरद गोसावी म्हणाले की, दहावीच्या परिक्षेला बसणाऱ्यांचे प्रमाण यंदाच्यावर्षी वाढले होते. एकूण १६ लाख विद्यार्थ्यांनी १० वी परिक्षेसाठी अर्ज भरला होता. निकालात मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७ टक्के जास्त असून मुलं ९४.५६ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील १०८ विद्यार्थ्यांना शंभर पैकी १०० गुण मिळाल्याचे सांगितले.

तसेच शरद गोसावी म्हणाले की, यंदा परिक्षा निकोप वातावरणात पार पडल्याचा दावा करत कॉपीमुक्त परिक्षेसाठी २७१, महिलांची विशेष पथके, जिल्हास्तरावर स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आल्याचे सांगितले.

१० वी निकालातील वैशिष्टै आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सूचना-ः

१० वीचा जिल्हानिहाय निकालः-

 

About Editor

Check Also

नेपाळच्या पुरामुळे बोगद्यात अडकलेल्या कामगार आणि इंजिनिअरची सुटका बचावलेल्या कामगार आणि इंजिनिअरची पुनर्जन्म झाल्याची भावना

नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी अचानक पुरामुळे (flash floods) एका जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अनेक कामगार अडकले होते. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *