आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आयआयटी बॉम्बेच्या समोर तीव्र आंदोलन केले. साहिल वाकोडेच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. ही कारवाई निष्पक्ष व पारदर्शी करावी आणि साहिल वाकोडेच्या आत्महत्येस जबाबदार असलेले प्राध्यापक सुर्यनारायण डुल्ला यांना सेवेतून बरखास्त करावे, अशी मागणी मुंबई …
Read More »आयआयटी-मुंबईकडून साहिल वाकोडेच्या आत्महत्येप्रकरणी केलेल्या वक्तव्याची मागितली माफी कोणत्याही संचालकाचा राजीनामा नाही
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबईने एका विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या परिस्थितीसंदर्भात पूर्वी केलेल्या पत्रव्यवहाराबद्दल माफी मागितली आहे. या घटनेपर्यंतच्या घटनांचा तपशील अधिकाऱ्यांकडून तपासाधीन असल्याचे संस्थेने म्हटले आहे. याव्यतिरिक्त, संस्थेने असेही कळवले आहे की संचालक, प्रा. शिरीष केदारे यांनी राजीनामा दिलेला नाही. “साहिल वाकोडेच्या दुर्दैवी निधनाच्या परिस्थितीसंदर्भात आमच्या पूर्वीच्या पत्रव्यवहारातील विधानांबद्दल आम्ही …
Read More »जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ शेवटची तीन महिन्यांची मुदतवाढ
२०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी), इतर मागासवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, अशा उमेदवारांना जात वैधता …
Read More »एका शिक्षकाच्या तात्काळ विचाराने शाळेच्या हजारो विद्यार्थ्यांचे वाचले प्राण त्रिशुली नदीच्या खोऱ्यात त्रिभुवन त्रिशुली माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी बचावले
नेपाळच्या त्रिशुली खोऱ्यातील ‘त्रिभुवन त्रिशुली माध्यमिक विद्यालया’चे मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी यांना बुधवारी सकाळी ९:२० वाजता एका मित्राकडून हा इशारा मिळाला. त्याने सांगितले की गाव नष्ट झाले आहे; नदीने ते गिळंकृत केले आहे. त्याने मला पळून जाण्यास सांगितले. हिमनदीचे ग्लेसियर कोसळल्यामुळे निर्माण झालेल्या विनाशकारी महापुराने डोंगराळ भागातील नद्यांच्या प्रवाहातून रौद्र रूप …
Read More »अभिजीत दीपके यांचा आरोप, आजही काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जनावरांपेक्षा वाईट सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पुरेशा सुविधा नाहीत, तरीही विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठवले जातेय
सरकारी शाळांच्या कथित दयनीय अवस्थेवरून कॉकरोच जनता पक्षाचे (सीजेपी) संयोजक अभिजित दीपके यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना म्हणाले की, योग्य वर्गखोल्या, बाक, शौचालये आणि सुरक्षित रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांशिवाय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास भाग पाडले जात आहे. लातूरमधील एका जिल्हा परिषद शाळेला भेट देताना …
Read More »धनंजय शिंदे यांची मागणी, एमएमआरडीए अभियांत्रिकी भरती परीक्षेतील घोटाळ्याची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करा परिक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्याचे पालक नगरविकास विभागात कार्यरत
भाजपा सरकारच्या काळात परिक्षांना पेपरफुटीचे ग्रहण लागले असून सरकार एकही परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही. नीट, टीईटी पेपरफुटीनंतर आता एमएमआरडीए MMRDA च्या अभियांत्रिकी भरती परीक्षेत मोठा घोटाळा झाला आहे. या परिक्षेचा १४ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर झालेला निकाल आणि गुणवत्ता यादीसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये गंभीर अस्वस्थता निर्माण झाली आहे. मेरिट लिस्टच्या प्राथमिक …
Read More »मुंबईत पोलिसाची विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या पुढ्या खिशात ठेवून अडकविण्याची धमकी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस आणि आपकडून टीका
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी मुंबईत झालेल्या नाट्यमय विद्यार्थी आंदोलनानंतर आणि विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, पोलिसांच्या व्हॅनमध्ये चित्रित केल्याचा दावा असलेला एक व्हिडिओ मोठ्या वादाला तोंड फोडले. या क्लिपमध्ये एक पोलीस चालक ताब्यात घेतलेल्या विद्यार्थी आंदोलकांना, जर त्यांनी पुन्हा आंदोलन केले तर त्यांच्यावर खोटे ड्रग्जचे गुन्हे दाखल करण्याची धमकी देताना …
Read More »प्रताप सरनाईक यांची ग्वाही, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व सुलभ शिक्षणप्रवासासाठी एसटी कटिबद्ध दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचविण्याचे सामाजिक दायित्व एसटी महामंडळाचे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ ही केवळ प्रवासी वाहतुकीचे साधन नसून राज्यातील लाखो शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, सुरक्षिततेची आणि उज्ज्वल भविष्याची विश्वासू जीवनवाहिनी बनली आहे. दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचविण्याचे सामाजिक दायित्व एसटी महामंडळ अनेक दशकांपासून प्रभावीपणे पार पाडत असल्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप …
Read More »राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका, त्यांना आंब्यावर बोलायला वेळ होता सीबीएसईच्या उत्तर पत्रिकांच्या स्कॅनिंगच्या घोळामुळे गोंधळ
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी इयत्ता १२वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीसाठीच्या बोर्डाच्या निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सरकार आणि सीबीएसईवर आपला हल्ला अधिक तीव्र केला आहे. व्यावसायिक उपकरणांऐवजी मोबाईल फोन वापरून उत्तरपत्रिका स्कॅन केल्या गेल्याचे नवीन दावे त्यांनी केले आहेत. सीबीएसईच्या पहिल्या डिजिटल मूल्यांकन प्रक्रियेवरून निर्माण झालेल्या वादाचा चेहरा बनलेल्या विद्यार्थ्यांशी …
Read More »लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन महाराष्ट्र शासनाकडून डॉक्टरेट करणाऱ्यांसाठी शिष्यवृत्ती, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रख्यात अशा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स संस्थेत अध्यासन स्थापनेचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यासनाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्तीही देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. भारतरत्न डॉ. …
Read More »
Marathi e-Batmya