अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर तर महाराष्ट्रातील या मान्यवरांना पद्म विभूषण माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पद्मभूषण

केंद्र सरकारने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल मान्यवरांना पद्म भूषण, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यात अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेने यांनाही मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहिर करण्यात आला. तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात महत्वाची भूमिका बजावणारे आणि राज्यपाल भवनाचा वापर भाजपाचे पक्ष कार्यालय म्हणून वापरणारे भगतसिंग कोश्यारी यांच्या पक्षनिष्ठेचे कौतुक म्हणून पद्म भूषण पुरस्कारने केंद्र सरकारने गौरवले आहे.

तर चित्रपट क्षेत्रातील पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना पद्म भूषण, जाहिरात लेखक पियुष पांडे यांना मरणोत्तर पद्म भूषण पुरस्कार जाहिर करण्यात आल आहे.

याशिवाय महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, आर्मिडा फर्नाडिस आणि श्रीरंग लाड यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

About Editor

Check Also

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे युजीसीच्या समता नियमनाविरोधात आंदोलन जाती आधारीत आरक्षणात सुधारणा करण्याची मागणी

४५ दिवसांपासून सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाचे ठिकाण असलेल्या नवी दिल्लीतील जंतर मंतरवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *