महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहिर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडून पदक देण्यास मान्यता

दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील एकूण ४९ व्यक्तींना आज ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मान्यतेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार २०२४’ आज जाहीर झाले. महाराष्ट्रातील शशिकांत रामकृष्ण गजबे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार दादाराव गोविंदराव पवार, ज्ञानेश्वर मुकुंदराव भेदोडकर यांना जाहीर करण्यात आले.

देशातील ४९ नागरिकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यातील १७ नागरिकांना ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर करण्यात आले. यामध्ये पाच व्यक्तींना मरणोपरांत पुरस्कार प्रदान करण्यात येतील. देशातील नऊ जणांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले असून एका व्यक्तींस मरणोपरांत पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ एकूण २३ जणांना जाहीर झाले आहेत.

या पुरस्काराचे स्वरूप पदक, केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि रोख रकम असे आहे. हे पुरस्कार संबंधित राज्य शासनामार्फत नंतर प्रदान करण्यात येतील.

About Editor

Check Also

Artificial Intelligence name changed to Super Intelligence

Super Intelligence : एआयचे नाव बदलले! आता ते या नावाने ओळखले जाईल मस्क, पिचाई आणि झुकरबर्ग यांच्या उपस्थितीत ट्रम्प यांचा मोठा निर्णय

Super Intelligence: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मोठ्या आणि ऐतिहासिक निर्णयावर स्वाक्षरी केली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *