देशातील प्रथम नागरिक आणि सर्वोच्च घटनात्मक प्रमुख पदावरील महनीय व्यक्तींनी गुरुवारी दूरदर्शनच्या माध्यमातून मतदारांना पुढे येऊन भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. निवडणुकीच्या पहिल्या फेरीच्या काही तास अगोदर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मतदारांना, विशेषत: प्रथमच मतदारांना मतदानात सहभागी होण्यासाठी आणि देशाचे भविष्य ठरवण्यात योगदान देण्याचे आवाहन …
Read More »इराणने ताब्यात घेतलेल्या जहाजावरील पहिला भारतीय क्रु मेंबर भारतात परतली
इराणी अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी ताब्यात घेतलेल्या पोर्तुगाल ध्वजांकित MSC मेष या जहाजावरील सतरा भारतीय खलाशांपैकी एक केरळमध्ये परतला आहे, अशी घोषणा परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. त्रिशूर येथील रहिवासी असलेल्या सुश्री ॲन टेसा जोसेफ १८ एप्रिल रोजी इराणहून आल्यावर सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांचे कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. “तेहरानमधील भारतीय मिशनने …
Read More »१०५ लोकसभा मतदारसंघातील जनतेची प्राथमिकता कोणत्या मुद्यांना लोकनीती प्री-पोल सर्व्हेत दिली कारणे
मागील महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर करण्यात आली. त्यावेळी देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघामध्ये सात टप्प्यात मतदान घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केले. यातील पहिल्या टप्प्यात देशातील १०५ या सर्वात मोठ्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी थंडावला. तसेच या १०५ मतदारसंघातील उमेदवारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून १९ एप्रिल रोजी मतदान …
Read More »५ लोकसभा मतदारसंघातील १,४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून यंदा १८-१९ या वयोगटातील १ लाख ४१ हजार ४५७ नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नवमतदारांनी मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. मुख्य निवडणूक …
Read More »चोकलिंगम यांची माहिती, पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज, १५० कंपनी तैनात
महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये १९ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण १०,६५२ मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत ९५,५४,६६७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी बॅलेट युनिट (बीयु) २१,५२७ तर …
Read More »अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने केवळ अत्यावश्यक सेवेत मतदानाच्या दिवशी कार्यरत असल्यामुळे मतदान न करू शकणाऱ्या मतदारांसाठी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधा प्रक्रियेसाठी संबंधित विभागाने समन्वय अधिकारी नियुक्त करणे आवश्यक असल्याचे मुंबई दक्षिण …
Read More »पहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत करणार मतदारांना आवाहन
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना आता कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची ‘सदिच्छादूत’ म्हणून साथ लाभली आहे. पाहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत मतदारांना मतदानाचे महत्व समजून देण्यासाठी आवाहन करणार आहेत. समाज …
Read More »ठाणे जिल्हयात तृतीयपंथी मतदारांची संख्या अधिक
लोकसभा निवडणुकीत २००४, २००९ च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन २०१४ च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार, महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती. आता २०१९ च्या तुलनेत तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ठाण्यात सर्वांधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. २०१४ मध्ये या तिसऱ्या …
Read More »हायब्रिड स्किल विद्यापीठ म्हणजे काय रे भाऊ, राज्य मंत्रिमंडळाची तर मान्यता
राज्यात मोठ्या तोऱ्यात हायब्रिड स्किल विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे-फडणवीस-पवार यांच्या राज्य सरकारने मार्च महिन्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. तसेच त्यासाठी महाप्रीत या आणखी एका संस्थेची स्थापना करत महाप्रीतच्या माध्यमातून या विद्यापीठांची स्थापना करण्यात येणार असल्याचे जाहिर केले. मात्र यासंदर्भात राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या …
Read More »भ्रष्टाचारप्रकरणी अब्जाधीश महिलेला व्हिएतनाममध्ये थेट फाशीची शिक्षा
व्हिएतनामी रिअल इस्टेट उद्योजिका ट्रुओंग माय लॅन याला देशाच्या सर्वात मोठ्या फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात हो ची मिन्ह सिटी येथील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असल्याची माहिती इंडिया टूडेच्या इंग्रजी संकेतस्थळाने दिली. ट्रुओंग माय लॅन (६७), यांना २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती, व्हॅन थिन्ह फाट या रिअल इस्टेट कंपनीच्या त्या अध्यक्षा …
Read More »
Marathi e-Batmya