मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अलीकडेच एका आंतर-विवाह करणाऱ्या जोडप्याला पोलीस संरक्षण देण्यास नकार दिला, या जोडप्याने विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत त्यांचे विवाह नोंदणीकृत केले आणि मुस्लिम पर्सनल बोर्ड लॉ नुसार मुस्लिम पुरुष आणि हिंदू स्त्री यांच्यातील विवाह अवैध असल्याचे निरीक्षण नोंदवले. जोडप्याने पोलिस संरक्षण मागणारी याचिचा मध्य प्रदेश उच्च …
Read More »भारतीय लष्करी अधिकारी राधिका सेन युएनचा जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा पुरस्कार
भारतीय लष्करी अधिकारी मेजर राधिका सेन यांना ३० मे रोजी UN सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्याकडून UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी मेजर राधिका सेन यांचे “खरे नेते आणि आदर्श” म्हणून कौतुक केले आहे. मेजर सेन यांनी काँगोमधील यूएन मिशनमध्ये भारतीय महिला …
Read More »डिआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर व्ही कामत यांना एक वर्षाची मुदतवाढ लष्कर प्रमुख मनोज पांडे यांच्यानंतर डॉ समीर व्ही कामत यांनाही वाढ
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने २७ मे रोजी संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे अर्थात डीआरडीओ सचिव डॉ समीर व्ही कामत आणि संरक्षण संशोधन विकास संस्था (DRDO) चे अध्यक्ष यांना ३१ मे २०२५ पर्यंत एक वर्षाची मुदतवाढ दिली. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने ३१ मे २०२४ पासून ३१ मे २०२५ अशी एक वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची …
Read More »१० वीचा निकाल जाहिरः उतीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण वाढले, १.९८ टक्क्याने वाढ विभागीय निकालात कोकण पहिला, तर नागपूरचा सर्वात कमी
राज्यातील १० वी परिक्षेचा निकाल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहिर केला. निकालात उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी १.९८ टक्क्याने निकाल वाढीव स्वरूपात लागला आहे. यंदाच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून ९९.१ टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूरचा अशून ९४.७३ …
Read More »इस्रो सचिव सोमनाथ एस यांची माहिती, पेलोड तंत्रज्ञान आणि अंतराळ बाऊड प्रगतीवर इस्रो आणि नासाच्या मदतीने काम सुरु
भारत पहिल्यांदाच भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो (ISRO) प्रयोगशाळांच्या बाहेरील सुविधांमध्ये पेलोड तंत्रज्ञान आणि अंतराळ-बाउंड हार्डवेअरमध्ये प्रगती करत आहे, असे अंतराळ विभागाचे अध्यक्ष आणि सचिव सोमनाथ एस यांनी म्हटले आहे. या कंपन्यांना जागतिक स्तरावर नेण्याचे उद्दिष्ट ठेवून, एका महत्त्वाच्या वाटचालीत, इस्रो ISRO ने भारतीय कंपन्यांकडून पेलोड आणि उपग्रह मिळवण्याची …
Read More »व्ही के सक्सेना यांनी दाखल केलेल्या खटल्यात मेधा पाटकर दोषी दिल्ली न्यायालयाने ठरविले दोषी
नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना व्ही के सक्सेना यांनी २००१ मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात शुक्रवारी दिल्ली न्यायालयाने दोषी ठरवले. व्हीके सक्सेना सध्या दिल्लीचे नायब राज्यपाल आहेत. साकेत न्यायालयाचे महानगर दंडाधिकारी राघव शर्मा यांनी पाटकर यांना भारतीय दंड संहिता, १८६० च्या कलम ५०० अंतर्गत गुन्हेगारी …
Read More »केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार मतदान केंद्र निहाय मतदानाची टक्केवारीची माहिती वेबसाईटवर अपलोड करण्याची माहिती
सर्वोच्च न्यायालयाने २४ मे रोजी निवडणूक आयोगाला लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रनिहाय मतदानाचा डेटा आपल्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे निर्देश जारी करण्यासंदर्भात एडीआर या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र एडीआरने दाखल केलेल्या याचिकेवर थेट अंतरिम दिलासा देण्याऐवजी एडीआरने दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने नाकारत सदरची याचिका मुख्य …
Read More »१२ वी निकालाबाबत उच्च व माध्यमिक मंडळाची घोषणा; उद्या दुपारी जाहिर
राज्यात लोकसभा निवडणूकीचा माहोल असल्याने आणि महाराष्ट्रातील पाचव्या व शेवटच्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज पार पडली जात आहे. या घडामोडीतच १२ वी परिक्षेच्या निकालाबाबत मात्र उच्च व माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च मध्ये घेतलेल्या परिक्षांच्या निकालाबाबत अधिकृत घोषणा केली. उद्या दुपारी १ वाजल्यापासून १२ वी परिक्षेचा निकाल ऑनलाईन जाहिर करण्यात येणार …
Read More »संसदेत मंजूर तीन नव्या भारतीय दंड संहिता कायद्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
लोकसभा निवडणूकीच्या काही दिवस आधी संसदेत ब्रिटीश कायदे बदलून पूर्णता भारतीय संसदेने मंजूर केलेले भारतीय दंड संहिता कायदा, भारतीय पुरावा कायदा, भारतीय गुन्हे कायद्याचा मसुदा मंजूर करण्यात आला. मात्र लोकसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत भाजपाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा कायदा १ जुलै पासून अंमलात येणार असल्याची घोषणा केली. विशेष …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या त्या हेट स्पीच प्रकरणी न्यायालयाने मागवला अॅक्शन टेकन रिपोर्ट
२१ एप्रिल रोजी राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या कथित द्वेषपूर्ण भाषणाबद्दल दिल्ली पोलिसांनी केलेल्या तक्रारीवरून दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी दिल्ली पोलिसांकडून कारवाईचा अहवाल मागवला. तक्रारदार, कुर्बान अली यांनी आरोप केला आहे की, हे भाषण आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे, धार्मिक गटांमधील शत्रुत्वाला प्रोत्साहन देते आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारी विधाने …
Read More »
Marathi e-Batmya