Tag Archives: मुख्यमंत्री

ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्यास मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय

ऊस गाळप हंगामाचे सन २०२६-२७ बाबत धोरण निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री समितीची बैठक झाली. या बैठकीत यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मुख्य …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय क्षेत्रात नवे परिवर्तन घडविण्याची संधी ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ कार्यक्रमात बोलताना दिली माहिती

डिजिटल वित्तीय क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध असून, एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ सेंटर येथे आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’ मध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले सात महत्वाचे निर्णय बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज राज्य अतिथी गृह सह्याद्री येथे पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह इतर मंत्रीगण उपस्थित होते. आज झालेल्या या बैठकीत प्राविण्यप्राप्त खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी “प्रगती प्रकल्प, ह्योसंग इंडियाला भांडवली अनुदान …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स समवेत ‘मेगा प्रोजेक्ट’ उभारणीसाठी सामंजस्य करार येवला औद्योगिक क्षेत्रात ₹७६० कोटींची गुंतवणूक; ३,२०० रोजगारांच्या निर्मितीला चालना

येवला औद्योगिक क्षेत्रात ७६० रुपये कोटी गुंतवणूकीच्या माध्यमातून  ३,२०० रोजगारांच्या निर्मितीला चालना देण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग आणि सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स यांच्यामध्ये ‘मेगा प्रोजेक्ट’ उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या कार्यक्रमात सुखजीत स्टार्च अँड केमिकल्सच्या सामंजस्य कराराचे हस्तांतरण झाले. यावेळी अन्न व नागरी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशांनुसार पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक तपासणी कुपोषित बालकांमधील टीबी तपासणीला मिळणार गती, प्रतिबंधात्मक उपचार व डिजिटल नोंदणीवर भर

कुपोषित बालकांमध्ये क्षयरोगाचे (टीबी) वेळीच निदान होऊन त्यांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये (NRC) टीबी तपासणीची कार्यपद्धती अधिक बळकट करण्यात आली आहे. कुपोषणामागील एक महत्त्वाचा घटक असलेल्या बाल टीबीचे निदान, उपचार आणि प्रतिबंध यासाठी राज्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाच्या २ …

Read More »

दुष्काळ आणि अल निनोमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा माजी आमदार धीरज देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा पाऊस आणि अल निनोच्या प्रभावामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सर्वसमावेशक विशेष दुष्काळ निवारण पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.​ मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, ‘नशामुक्त महाराष्ट्र’ला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे वरळी, दादर, घाटकोपर येथे आयोजित विविध दहीहंडी उत्सवाना भेट

युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे, यासाठी सामाजिक उपक्रमांना व्यापक लोकसहभागाची जोड देणे आवश्यक आहे. उत्साहाने भरलेल्या दहीहंडीच्या उत्सवामधून ‘नशामुक्त महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळकटी देण्याचे काम व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरळी, दादर, घाटकोपर येथे आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या यशात महाराष्ट्र प्रमुख भागीदार भारत-बेल्जियम भागीदारीमुळे जागतिक व्यापाराला नवी दिशा मिळणार असल्याचे बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर यांचे प्रतिपादन

भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा केवळ शुल्क, नियम आणि बाजारपेठेतील प्रवेशापुरता मर्यादित नसून विश्वासावर आधारित व्यापक भागीदारीचा करार आहे. या कराराच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या संधींचे आर्थिक परिणामांमध्ये रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असून, भारत-युरोपियन युनियन आर्थिक भागीदारीच्या यशात महाराष्ट्र प्रमुख भागीदार ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र आणि बेल्जियम …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, बजाज फिनसर्व्हच्या अत्याधुनिक मुख्यालयामुळे पुण्याच्या विकासाला नवी दिशा पुण्यातील वाहतूक व्यवस्था वेगवान करण्याचा मुख्यमंत्र्यांकडून निर्धार व्यक्त

बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून पुण्यात उभारण्यात येणारे आधुनिक आणि शाश्वत सुविधांनी युक्त मुख्यालय शहराच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुण्याला देशातील आधुनिक आणि वेगवान मोबिलिटी असलेले शहर म्हणून विकसित करण्यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा वेगाने उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. बजाज फिनसर्व्हच्या प्रस्तावित मुख्यालयाच्या …

Read More »

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मंत्रिमंडळातून वनमंत्री कोंडा सुरेखा यांना काढले वनमंत्री कोंडा सुरेखा यांच्या मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर केली होती टीका

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी वनमंत्री कोंडा सुरेखा यांना मंत्रिमंडळातून तात्काळ हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांच्या मुलीने मुख्यमंत्र्यांवर जाहीर हल्ला करण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच काँग्रेसच्या हायकमांडपर्यंत पोहोचलेला राजकीय वाद यामुळे अधिकच चिघळला आहे. गुरुवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, सुरेखा यांना हटवण्याची शिफारस तेलंगणाचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांना पाठवण्यात …

Read More »