Tag Archives: आमदार

आमदार रईस शेख यांची माहिती, भिवंडी शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील अडथळे दूर करणार बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचेही आश्वासन

अमृत अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या भिवंडी- निजामपूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनसाठी भाडेतत्त्वावर जागा देण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिका १० दिवसांमध्ये सर्व अडथळे दूर करेल, असे आश्वासन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले, अशी माहिती भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी दिली. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये शुक्रवारी, …

Read More »

आमदार रईस शेख यांची टीका, १०० दिवसांमध्ये मुंबई पालिकेवर रोख्याद्वारे पैसे उभे करण्याची वेळ काटकसरीसाठी सल्लागार न नेमण्याच्या सरकारच्या आदेशाला प्रशासनाचा हरताळ, रोखे आणि सल्लागाराचा निर्णय रद्द करण्याची मागणी

आशियातील सर्वाधिक श्रीमंत महापालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर पहिल्या १०० दिवसांमध्येच  रोख्याद्वारे पैसे उभारण्याची वेळ पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आणली असून ‘काटकसरीसाठी सल्लागार नेमू नये’ या सरकारच्या आदेशाला पालिका प्रशासनाने  हरताळ फासला आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली. या संदर्भात बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, मुंबई …

Read More »

विलास तरे यांची मागणी, परकीय चलनवाढीसाठी शेतकऱ्यांनी निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन करावे भारताचा परकीय चलन साठ्यात वाढ करण्यासाठी केली मागणी

भारताच्या परकीय चलन साठ्यात वाढ होण्यासाठी देशातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच निर्यातक्षम शेतीमाल उत्पादनाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे मत बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी केले. पालघर येथे महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन सभेत ते बोलत होते. यावेळी उपस्थित शेतकरी, कृषी अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी …

Read More »

शिंदेच्या संजय गायकवाड यांचा हॉटेलमधील गुंडागिरीनंतर वैचारीक क्षेत्रात गुंडगिरीचा प्रयत्न ३८ वर्षानंतर शिवाजीच्या एकेरीच्या उल्लेखाची आठवण

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी, ३८ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील एका पुस्तकावरून आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि शिवीगाळ केली, असा आरोप एका प्रकाशकाने गुरुवारी केला. सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. या क्लिपमध्ये संजय गायकवाड हे आक्षेपार्ह …

Read More »

रईस शेख यांचा दावा, भिवंडीकरांसाठी मेट्रो मार्ग ५ च्या सुधारित आराखड्याला शासनाची मान्यता भिवंडीच्या जनतेला दिलेला शब्द पाळला

मुंबई मेट्रो मार्ग ५ च्या सुधारित आराखड्याला राज्य शासनाची अंतिम मान्यता मिळाली आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो प्रकल्पासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. विधिमंडळात आवाज उठवला आणि अखेर १८ हजार १३० कोटींच्या या महाप्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. भिवंडीच्या विकासासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी आमचा संघर्ष फळाला आला, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे भिवंडी …

Read More »

आमदार विलास तरे यांचा विधानसभेत सीडी देत अंमली पदार्थ विक्रीचा केला भांडाफोड मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले चौकशी व कारवाईचे आदेश

वसई विरार शहर हद्दीत मोठ्या प्रमाणावर दिवसाढवळ्या खुलेआम अंमली पदार्थांची विक्री होत असल्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाश्वभूमीवर विधानसभेत तारांकित प्रश्न क्र. २४५६९  उपस्थित करत विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून मुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीडी देत अंमली पदार्थ विक्रीचा भांडा फोड केला असून त्यावर मंत्र्यांनी चौकशी करून कारवाई चे आदेश दिले …

Read More »

आमदार विलास तरे यांची माहिती, २ वर्षात २०० एस. टी. बसेस पालघर वासियांना मिळणार परिवहन मंत्री तथा सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबतच्या बैठकीत निर्णय

पालघर जिल्ह्यातील राज्य परिवहन सेवेतील मनुष्यबळ व बसेस कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने परिवहन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत पालघर जिल्ह्यासाठी पुढील २ वर्षांत एकूण २००  नवीन एस.टी. बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बोईसर विधानसभा …

Read More »

राज ठाकरे यांना भेटल्यानंतर रोहित पवार म्हणाले, अपघातानंतर एफआयआर का घेतला नाही हाच प्रश्न अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर, या अपघातामागे घातापात असल्याचे कर्जत जामखेडचे आमदार तथा अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत रोहित पवार यांनी जवळपास तीन दिन झाले, रोहित पवार हे यांनी सुरुवातीला मंत्रायाच्या जवळील मरिन लाईन्स पोलिस स्टेशन आणि …

Read More »

रईस शेख यांची मागणी, मुस्लीमांना दिलेल्या प्रमाणपत्राची माहिती महसुल विभागाने जाहिर करावी मुस्लीम आरक्षण वैध असणाऱ्या काळात किती जात प्रमाणपत्रे दिली

जुलै २०१४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तत्कालीन आघाडी सरकारने मुस्लीम समाजातील ५० पोटजातींना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा अध्यादेश जारी केला होता. डिसेंबर मध्ये सदर अध्यादेश व्यपगत झाला. मात्र सहा महिन्यांच्या काळात मुस्लीम समाजाचे आरक्षण वैध होते. त्यादरम्यान किती नागरिकांना जात प्रमाणपत्रे मंजुर करण्यात आली आहेत, याची आकडेवारी महसूल वभागाने जाहीर …

Read More »

आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, लॉजिस्टीक पार्क भिवंडीसाठी जाहिर करा अर्थसंकल्पामध्ये भिवंडीसाठी लॉजिस्टिक पार्कची घोषणा करावी

राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या गीग कामगारांना  सुविधा मिळण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक आणावे तसेच भिवंडीसाठी लॉजिस्टिक पार्क जाहीर करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. आमदार शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात सोमवारी पत्र लिहिले आहे. यासंदर्भात माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, …

Read More »