Tag Archives: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

विद्यार्थ्यांना दिलासा: प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरिता सहा महिन्यांची मुदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान …

Read More »

पॉलीटेक्निक प्रवेशासाठी अर्ज करण्यास ६ जुलैपर्यंत मुदतवाढ; विद्यार्थ्यांना दिलासा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निर्णय

विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आणखी एक महत्त्वपूर्ण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निर्णय घेतला असून प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अर्थात पॉलीटेक्निक अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून ६ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत …

Read More »

हैद्राबाद कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये आणखी ५ महाविद्यालयांचा समावेश राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईतील हैद्राबाद(सिंध) नॅशनल कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये आणखी पाच महाविद्यालयांचा घटक म्हणून समावेश करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हैद्राबाद(सिंध) नॅशनल कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये प्रमुख महाविद्यालय म्हणून हसाराम रिजूमल वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय आणि घटक महाविद्यालये म्हणून किशनचंद चेलाराम, चर्चगेट, आणि बॉम्बे अध्यापक प्रशिक्षण महाविद्यालय, कुलाबा यांचा …

Read More »

चंद्रकांत पाटील यांचे आदेश, विद्यार्थ्यांचे शुल्क सहा टक्के व्याजासह परत करा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मुंबई उच्च न्यायालय यांच्या आदेशाच्या अनुषंगाने शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे विद्यार्थ्यांची बाजू न्याय्य ठरवत संबंधित महाविद्यालयास विद्यार्थ्यांकडून वसूल केलेले शुल्क सहा टक्के व्याजासह परत करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे येथील आय,एल,एस, विधि महाविद्यालय येथे …

Read More »

चंद्रकांत पाटील यांची माहिती, व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्क संदर्भातील अधिकार विद्यापीठांना विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रक्रियेला दिलासा

राज्यातील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्क संदर्भातील अनिश्चितता दूर करण्यासाठी बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस आणि इंटिग्रेटेड एमबीए या अभ्यासक्रमांच्या शिक्षण शुल्क संदर्भातील अधिकार संबंधित विद्यापीठांना देण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी या अभ्यासक्रमांचे …

Read More »

चंद्रकांत पाटील यांची माहिती, तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी भाषा व कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर. विद्यार्थ्यांना जर्मनी आणि जपान मध्ये रोजगारच्या संधी उपलब्ध

विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक असते. यासाठी जर्मनी, जपान आणि रशिया या देशांच्या भाषांचे प्रशिक्षण देण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. या भाषा प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय कामकाज संस्कृतीशी जुळवून घेण्याची क्षमता, संवाद कौशल्ये आणि व्यावसायिक आत्मविश्वास वाढेल. परिणामी, परदेशातील रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय …

Read More »

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती, ‘ई-निरसन’ प्रणालीचा शुभारंभ विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या साह्याने सेवा अधिक सुलभ व पारदर्शक देण्याचा प्रयत्न

डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी ‘ई-निरसन’ ही अत्याधुनिक डिजिटल प्रणाली विकसित केली असून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या साह्याने सेवा अधिक सुलभ व पारदर्शक देण्याचा प्रयत्न असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात ‘ई-निरसन प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. या …

Read More »

शासकीय व अशासकीय अनुदानित संस्थातील अधिव्याख्यात्यांना कॅस अंतर्गत लाभ मिळणार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

महाराष्ट्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून राज्यातील तंत्रशिक्षण विभागातील अध्यापकांच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ‘करिअर अॅडव्हान्समेंट स्कीम’ (CAS) अंतर्गत अध्यापका च्या पदोन्नती प्रक्रियेतील त्रुटी दूर करून गेली १५ वर्ष प्रलंबित असलेला असलेला विषयावर राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून हा महत्वपूर्ण …

Read More »

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा; परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जात असून परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सोबतच शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. …

Read More »

चंद्रकांत पाटील यांची घोषणा, राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करणार संगणक केंद्रे व प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावी, तसेच आवश्यक ते मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सामायिक …

Read More »