चंद्रकांत पाटील यांची माहिती, व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्क संदर्भातील अधिकार विद्यापीठांना विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रक्रियेला दिलासा

राज्यातील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्क संदर्भातील अनिश्चितता दूर करण्यासाठी बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस आणि इंटिग्रेटेड एमबीए या अभ्यासक्रमांच्या शिक्षण शुल्क संदर्भातील अधिकार संबंधित विद्यापीठांना देण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी या अभ्यासक्रमांचे शुल्क विद्यापीठांनी निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याच अनुषंगाने, विद्यार्थीहित लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी निश्चित केलेले शुल्कच शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीही लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे संबंधित अभ्यासक्रमांच्या शुल्क संरचनेत एकसंधता व स्पष्टता निर्माण होणार असून, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील.

शेवटी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, शुल्क निश्चितीबाबत स्पष्ट मार्गदर्शन नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता विद्यापीठांकडे शुल्क निश्चितीची जबाबदारी दिल्यामुळे अभ्यासक्रमांची मान्यता, शुल्क रचना आणि शिष्यवृत्ती प्रक्रिया अधिक सुसूत्र होणार आहे. यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरणार असून शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेला गती मिळेल आणि विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज सादर करता येईल. तसेच, व्यावसायिक शिक्षण अधिक सुलभ व पारदर्शक होण्यास मदत होईल आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल असे सांगितले.

………………………………
पीसीएम-पीसीबी विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्रयत्नासाठी नोंदणीकरिता २३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

पीसीएम आणि पीसीबी गटातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेत दुसऱ्या प्रयत्नासाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत २३ एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडून सातत्याने येणाऱ्या विनंत्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

या निर्णयानुसार, इच्छुक विद्यार्थ्यांना २३ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. यामुळे विविध कारणांमुळे पूर्वी नोंदणी न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, ही त्यांच्यासाठी सुवर्ण संधी ठरणार आहे.

विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घेण्यासाठी विलंब न करता तात्काळ नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळ : https://cetcell.mahacet.org

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांना आशा, मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनविण्यात यूडब्ल्यूए महत्वपूर्ण भूमिका बजावेल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन

मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *