Tag Archives: काँग्रेस

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, २००२ च्या गुजरात दंगलीप्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र पश्चिम बंगालमधील दंगली या त्याची सुरुवात, डिलिमिटेशन कमिटीत कोणत्या निवृत्त न्यायाधिशाला घ्यायचे त्यांचे नावही सुनिश्चित

भारतभरात दंगली घडवून आणण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे, त्यासाठी प्रशिक्षण हाती घेतल्याची माहिती आहे. पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालापासूनच धार्मिक तेढ निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. २००२ मध्ये गुजरातमध्ये जशा दंगली घडवून आणल्या होत्या, त्याच पद्धतीने देशभर दंगली करुन २०२९ च्या निवडणुका जिंकायच्या हे षडयंत्र आधीपासूनच रचले असून विधानसभा निवडणुकीनंतर …

Read More »

टीव्हीके प्रमुख विजय थलपती यांना ११८ आमदारांचा समर्थन दाखविण्याची राज्यपालांची सूचना तर डावे, एआयडीएमके आणि द्रमुक आघाडीचे सरकार स्थापनेचा दावा

सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय थलपती यांनी गुरुवारी तामिळनाडू लोक भवनात राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची पुन्हा भेट घेतल्यानंतर तामिळनाडूमध्ये तीव्र राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ११२ आमदारांचा पाठिंबा दर्शवल्यानंतर, विजय यांना २३४-सदस्यीय विधानसभेतील ११८ आमदारांच्या पाठिंब्याचा पुरावा सादर करण्यास सांगण्यात आले. काँग्रेसने …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, ‘देवेंद्र फडणवीस नव पुण्याचे शिल्पकार’, झाल्यापासून पुण्यात दररोज एक बलात्कार एपस्टिन फाईल्समध्ये नाव आल्यापासून नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दबावाखाली; युद्धबंदी, व्यापार करार, कच्चे तेल खरेदी करण्याचे निर्णय अमेरिकेकडून एकतर्फी जाहीर

‘नव पुण्याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस’, असे पोस्टर्स व बॅनर्स पुणे शहरात जागोजागी झळकवण्यात आले त्याच पुणे शहरात महिलांवरील लैंगिक अत्याचार वाढले आहेत. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात लैंगिक शोषणाची ७०० प्रकरणे घडली आहेत, दररोज एक बलात्कार होत आहे. ड्रग्जचा खुलेआम धंदा सुरु आहे. कोयता गँगचा हैदास सुरु आहे, गुलटेकडी मार्केट यार्डात गुंडांचा …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, कायदा सुव्यवस्थेप्रश्नी राज्यपालांनी लक्ष घालावे; ‘शक्ती’ कायदा लागू करा मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांची राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे पत्र पाठवून मागणी

राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. गुन्हेगारांना भिती बसली पाहिजे अशी शिक्षा झाली पाहिजे. नसरापूरच्या घटनेनंतर आतातरी राज्य सरकारने गंभीर होऊन महिला सुरक्षेवर काम करावे, यासाठी राज्यपाल यांनी जातीने लक्ष घालावे व ‘शक्ती’ कायदा लवकरात लवकर राज्यात लागू करावा यासाठी …

Read More »

शेतकरीविरोधी भाजपा सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसची ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली मानेगाव ते जळगाव जामोद पदयात्रा

केंद्रातील व राज्यातील भाजपा महायुतीच्या मागील १२ वर्षांच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमालाला भाव मिळत नाही व दुसरीकडे महागाईने शेती करणे कठीण झाले आहे. देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत तरीही भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाही. शेतकरी विरोधी भाजपा सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, महिला व मुलींवरील अत्याचार रोखण्यात भाजपा सरकार अपयशी फडणवीसांनी थापा मारण्यापेक्षा कृती करावी, महिला सुरक्षेवर भाजपा सरकार गंभीर नाही, महिला अत्याचार रोखण्यासाठी बनवलेला शक्ती कायदा मोदी सरकारकडे मंजूरीसाठी पडून..

पुण्यातील ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तीची हत्या करण्यात आल्याची घटना संताप आणणारी व माणुसकीला काळीमा फासणारी आहे, अशा नराधमांना फाशीच दिली पाहिजे. राज्यात कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे सांगण्यास ही घटना पुरेशी आहे. दररोज महिला अत्याचाराच्या घटना होत आहेत पण प्रत्येक घटनेनंतर कडक कारवाई करू व विरोधकांनी राजकारण करू नये …

Read More »

अहिल्यानगर- चंद्रपूरला जिल्हाधिकारी कार्यालय ५० कोटीच्या आत मात्र नागपूरात १०० कोटीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानुसार पहिल्या अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त प्रशासकीय इमारतीसाठी १०० कोटी रुपयांचा निधी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तेव्हाचे राज्याचे महसूल मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहिल्या नगरमध्ये नवे जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अहिल्यानगर मात्र पूर्वीचे अहमदनगर येथे इमारतीची उभारणीही केली. त्यासाठी राज्य सरकारकडून ५० कोटी रूपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला. त्याचधर्तीवर राज्यातील अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय नव्याने उभारायचे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, महिला आरक्षण उपकार नाही तर अधिकार देशातील ५० टक्के लोकसंख्येला मूर्ख समजू नका, डिलिमिटेशनच्या आड महिला आरक्षण अडवण्याचा भाजपाचा डाव - सुप्रिया श्रीनेत

महिला आरक्षणाचा पाया १९८५ साली मुंबईत काँग्रेसच्या शताब्दी वर्षानिमित्तच्या कार्यक्रमात स्व. राजीव गांधी यांनी घातला आणि यातूनच पुढे पंचायत राज प्रणाली आणली. ७३ व ७४ वी घटना दुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षण लागू केले नंतर ते वाढवून ५० टक्के केले. पुढे सोनियाजी गांधी यांनी महिला आरक्षणासाठी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, चिमुरडीवरील अत्याचार व हत्येचे प्रायश्चित म्हणून तरी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या जनता व प्रशासन तसेच कायदा व सुव्यवस्थेमध्ये मिसिंगलिंक

राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही सुरक्षित नाहीत हे सातत्याने उघड होत आहे. पुणे जिल्ह्यातील एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासणारा आहे, हे गृहविभागाचे अपयश असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव प्रदेश काँग्रेस मुख्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत धर्मांमध्ये भांडवणे लावण्याचे कारस्थान सुरु आहे, आपण सर्वांनी मिळून हा कुटील डाव हाणून पाडण्याची आवश्यकता असून महाराष्ट्र धर्माचे रक्षण करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करूया असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. महाराष्ट्र दिनी दादर येथील टिळक भवन येथे काँग्रेस …

Read More »