Tag Archives: काँग्रेस

नाना पटोले यांची मागणी, शेतकऱ्याला बुटाने मारहाण करणाऱ्या मुजोर कृषी अधिकाऱ्यावर कारवाई करा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

वाशिम जिल्ह्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजने अंतर्गत संत्रा फळबाग अनुदान रखडल्याबाबत विचारणा केल्याने एका शेतकरी बांधवाला कृषी अधिकाऱ्याने बुटाने मारहाण केल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून संबंधित मुजोर अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्याला तात्काळ न्याय द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणाऱ्या फडणवीसांच्या कूनितीची फळं.. भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाची विषवल्ली कापा

भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वातावरण अत्यंत गढूळ करून ठेवले आहे. महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेल्या निवडणूक कूनितीची फळं आज महाराष्ट्र भोगतोय, हे राज्यातील जनतेने लक्षात घ्यावे. देवेंद्र फडणवीस या व्यक्तीने व त्यांच्या भारतीय जनता पक्षाने जन्माला घातलेली विषवल्ली महाराष्ट्राच्या जागरूक …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भाजपा, शिंदेसेना, एमआयएम एकच, हिरव्या पतंगाचा मांजा भगवा महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा,

भारतीय जनता पक्ष व असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष हे धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन राजकीय स्वार्थ साधत आहेत. हिंदु मुस्लीम, मराठा-ओबीसी वाद निर्माण करून जनतेची माथी भडकवतात आणि सत्तेसाठी मात्र एकत्र येतात. हिरव्या पतंगाचा मांजा भगवा आहे तर धनुष्याचा बाण हिरवा आहे. या ढोंगी भाजपा, शिंदेसेना व एमआयएमला महानगरपालिका निवडणुकीत …

Read More »

पवन खेरा यांचा सवाल, देशात बांग्लादेशी घुसखोर आहेत तर मोदी शाह काय करतात मुंबईला भाजपाकडून धोका, किती दिवस मुंबईचा पैसा, जमीन व उद्योग गुजराती मित्राला देणार

भारतीय जनता पक्ष महायुती मुंबईतील जमीन, उद्योग व पैसा मोठ्या प्रमाणात एका गुजराती मित्राला देत आहेत, हा मुंबई व मुंबईकरांशी मोठा धोका आहे. मुंबई ही गुजरातच्या मित्रासाठी आहे का, याचे उत्तर महायुतीला द्यावे लागेल. मुंबईतील जमिनी विकून भाजपा शिदेंसेनेने अमाप पैसा जमवला आहे. मुंबईत आता परिवर्तनची गरज असून मुंबईशी धोका …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, नगरपालिकेप्रमाणे महानगरपालिकेतही काँग्रेसचा झेंडा फडकवू भाजपाच्या बुलडोझरला न घाबरता काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने उभा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने पैसा, पोलीस, प्रशासन व निवडणूक आयोगाच्या जोरावर संस्कृती, संकेत व परंपरा पायदळी तुडवत लोकशाहीचा तमाशा चालवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत अहंकारी असून ते विरोधी पक्षांवर बुलडोझर चालवत आहेत पण या बुलडोझरला न घाबरता काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने उभा राहिला म्हणूनच नगरपालिकेत ४१ नगराध्यक्ष व …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष बेटी बचाव, बेटी पढाव नाही तर भाजपापासून बेटी बचाव

भारतीय जनता पक्ष स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणते पण ते वस्तुस्थिती तशी नाही. भाजपात गुंड, मवाली, माफिया यांना आमदार, खासदार, मंत्री केले जाते, आता तर भाजपा बलात्काऱ्यांनाही पक्षात संधी देत आहे. बदलापूरमध्ये लहान मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपाने स्विकृत नगरसेवक करून विकृतीचा कळस गाठला आहे, असा घणाघाती हल्लाबोल करत …

Read More »

काँग्रेसची तक्रार, निवडणूक आयोगाची दखल, मुख्यमंत्री फडणवीस यांना नोटीस मुख्यमंत्री फडणवीसांच्या आचारसंहिता भंगाबाबत काँग्रेसच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ जानेवारी २०२६ रोजी मुंबई मेट्रो रेल्वेमध्ये एका खाजगी चॅनेल व त्यांच्या टीमला दिलेल्या मुलाखतीद्वारे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबाबत काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी ही माहिती दिली. या संदर्भात, ९ जानेवारी २०२६ …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, वांद्र्यातील एमएसआरडीसीची २४ एकर जमीन अदानीच्या घशात तर MSRDC चे ऑफिस दादरला २ कोटी रुपये भाड्याच्या जागेत

देवेंद्र फडणवीस सरकार दिल्लीच्या आदेशाने मुंबईतील मौल्यवान व अत्यंत महत्वाच्या जमिनी लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालत आहे. विमानतळ, धारावी, देवनार डंपिंग ग्राऊंड, मोतीलाल नगर, एअर इंडिया वसाहत, मदर डेअरीची जमीन व मिठागरांची जमीन दिल्यानंतर आता वांद्रे रिक्लमेशन येथील एमएसआरडीसीच्या कार्यालयाची २४ एकर जमीनही अदानीला बेकायदेशीरपणे दिली आहे. अदानीला आतापर्यंत मुंबईतील ३ …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, भाजपा व राष्ट्रवादी सत्तेत राहुन एकमेकावर आरोप कसले करतात? सांस्कृतिक शहर, विद्यचे माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आता ड्रग्ज; गुंडगिरी व कोयता गँगचे माहेरघर

राज्यात भाजपा, शिंदेसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ट्रिपल इंजिन सरकार आहे. तिन्ही पक्ष फक्त सत्तेची मलई खाण्यासाठी एकत्र आहेत. सत्तेत राहून अजित पवार भाजपावर व भाजपा अजित पवारांवर जाहीर व गंभीर आरोप करत आहेत. या दोन्ही पक्षांना आरोपच करायचे असतील तर सत्तेला चिकटून कशाला बसता, सत्तेतून बाहेर …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, निकोप, पारदर्शक व भयमुक्त निवडणुकांना राज्यात हरताळ पोलीस, प्रशासन व निवडणूक आयोगाच्या मदतीने सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात गुंडगिरी केली जात आहे. उमेदवारांना धमकावले जात आहे, पैशांचे आमिष दाखवून अर्ज भरु दिला जात नाही किंवा मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. पोलीस यंत्रणा, प्रशासन व निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बटिक बनले आहे. लोकशाहीत निवडणुका निकोप, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात …

Read More »