विजय वडेट्टीवार यांची मागणी, चाकणकर यांचा राजीनामा झाला, पण मोठ्या माशांवर कारवाई झाली पाहिजे भोंदूबाबा खरात याचे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न सुरू, पोलिसांवर तपास करताना दबाव

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या अत्यंत संतापजनक आणि अशोभनीय घटनांवरून हे स्पष्ट होत आहे की, सत्तेत बसलेल्या महायुती सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. रूपाली चाकणकर यांचा राजीनामा आणि खरात प्रकरणातून समोर आलेली मंत्र्यांची भोंदूगिरी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेला काळिमा आहे अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची बसलेल्या रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रातील महिलांना न्याय मिळवून देणे अपेक्षित होते पण त्यांनीच एका भोंदू बाबाचे मानसिक गुलामगिरी पत्करली ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. ज्योतिष आणि अनिष्ट प्रथांवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती महिलांना काय न्याय देणार?त्यांचा राजीनामा हा केवळ दिखावा नसून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणीही आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना केली.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, लिंगपिसाट खरात याच्या संपर्कात आलेल्या सर्व ‘नवरत्नांचा’ आणि मंत्र्यांचा सीडीआर CDR तपासला पाहिजे. खरातकडे असलेली अफाट संपत्ती आणि त्याला मंत्र्यांनी दिलेला राजाश्रय पाहता, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. पोलिसांवर दबाव टाकून मोठे मासे वाचवण्याचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोपही केला.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, एकीकडे खरातसारख्या व्यक्तीचे पाय धुतले जात आहे, तर दुसरीकडे कीर्तनकारांकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत आहेत. धर्माच्या नावाखाली सुरू असलेला हा अधर्म थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली पाहिजे, असे सांगत वडेट्टीवार म्हणाले, अरविंद शिंदे या काँग्रेसच्या नेत्यांनी चाकणकर प्रकरणी व्यक्त केलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक आहे पक्षाची नाही असे ही यावेळी स्पष्ट केले.

शेवटी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सातारा येथील निवडणुकीत बहुमत असतानाही शंभूराजे देसाई पालकमंत्री असताना त्यांच्याच सहकाऱ्यांना पळवून नेण्यात आले. यात मंत्री जखमी झाले. भाजपा सत्तेसाठी कोणत्या थराला जात आहे आणि ट्रिपल इंजिन सरकारमधील इंजिन कोणत्या दिशेने जात आहे हे यावरून स्पष्ट होत आहे. मित्र पक्षातील मंत्री निधीवरून नाराज आहेत आणि एकमेकांची जिरवण्याच्या नादात जनतेचे नुकसान महायुती सरकार करत असल्याची टीका केली.

About Editor

Check Also

नरहरी झिरवाळ यांची माहिती, अन्नपदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई विधान परिषदेत एका प्रश्नाला दिली माहिती

राज्यातील अन्नसुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी तपासणी मोहिमा अधिक व्यापक करण्यात येतील. अन्न पदार्थामध्ये भेसळ  करणाऱ्यांविरुद्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *