Tag Archives: प्रताप सरनाईक

प्रताप सरनाईक यांची घोषणा, नो पीय़ुसी नो फ्युएल प्रदुषण करणाऱ्या वाहनांना इंधन बंदी..

तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्यात विचार असुन, लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर, परिवहन आयुक्त …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे निर्देश, निधी वापराबाबत नियमावली करा परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना दिले निर्देश

रस्त्यावरील होणारे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. यासाठी  रस्ता  सुरक्षा  निधीतून  प्राधान्याने घेण्यात येणाऱ्या कामांसह निधी वापराबाबत नियमावली तयार करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात रस्ता सुरक्षा निधीबाबत, ऑटो-रिक्षा व मिटर्स टॅक्सी भाडे नाकारण्याच्या तक्रारीसंदर्भात …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे आदेश, एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका काढा… एसटी महामंडळ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले आदेश

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसेच भविष्यातील नियोजना करता, एक आर्थिक श्वेतपत्रिका  तयार करावी. असे निर्देश परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. आज एसटीच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, वित्तीय …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे आदेश, प्रवाशांना चांगली सुविधा न देणाऱ्या हॉटेल -मोटेल थांबे रद्द एसटी प्रशासनाला दिले निर्देश

लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री . प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील १५ …

Read More »

प्रताप सरनाईक यांची ग्वाही, एसटीचा पगार दरमहा ७ तारखेला होण्याची जबाबदारी माझी यावेळी वेतन एकाच महिन्यात दोन वेळा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी घेतली जबाबदारी

यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होईल, याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल! असे नि: संदिग्ध आश्वासन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले. ते एसटी मुख्यालयात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य व परिवहन …

Read More »

एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार वित्त विभागाने ₹१२० कोटी तातडीने दिले मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यांत उर्वरित वेतन जमा होणार

एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रखडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रश्नासाठी राजशिष्टाचाराला बगल देत मंत्रालयात वित्त सचिवांचा दालनात बैठक घेऊन वित्त सचिव सौरभ विजय यांच्या कडे एसटी महामंडळाचे विविध सवलती पोटी  शासनाकडे थकीत असलेले ₹ १०७६ कोटी रुपये तातडीने दयावेत अशी आग्रही मागणी केली. यावेळी बोलताना मंत्री …

Read More »

अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती आयएएस अधिकाऱ्याकडून एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद काढून मंत्र्यांकडे सुपुर्द

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपामध्ये कुरबुरी वाढल्या होत्या. त्यामुळे एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद राज्याच्या परिवहन मंत्र्यांकडे राहत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदी स्वतंत्र आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे आदेश, एसटीचे जाहिरातीचे उत्पन्न १०० कोटी रुपयांपर्यंत वाढवा चांगले उत्पन्न देणाऱ्या संस्थांची निवड करा

एसटी महामंडळाच्या बसेस तसेच स्थानकांवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी सर्वंकष नवीन धोरण तयार करून त्यामाध्यमातून मिळणारे उत्पन्न १०० कोटी रुपयांपर्यंत वाढवावे अशा निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. परिवहन आयुक्तालय येथे राज्य परिवहन महामंडळाची आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव …

Read More »

प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती, जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नंबर प्लेट प्रक्रिया गतीमान विधान परिषदेतील प्रश्नाला उत्तर देताना दिली माहिती

केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या तरतुदीनुसार, जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांना एचएसआरपी बसवण्याची योजना आखण्यात आली आहे. २०१९ नंतर नोंदणीकृत सर्व नव्या वाहनांना निर्माता कंपन्यांकडूनच एचएसआरपी बसवून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी …

Read More »

‘एसटी’ महामंडळात मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त कार्यरत अधिकाऱ्यांची बदली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार …

Read More »