राज्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला असून लोकसभा निवडणूक २०२४ चे कामकाज सुरु झाले आहे. त्यासाठी केंद्रिय निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता जाहिर करण्यात आलेली आहे. असे असताना प्रभारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मोठया प्रमाणात रस्त्याच्या डागडुजीची कामे करण्यात येत असून स्वच्छतेसाठी स्थानिक प्रशासनाकडून मोठया प्रमाणात खर्च करण्यात येत …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा सवाल, सत्तापिपासून भाजपा मृतदेहावरून रॅली काढतंय काय?
मुंबईमध्ये होर्डींग दुर्घटना घडली आहे. भ्रष्ट महायुतीमुळे या दुर्घटनेत १८ जणांना जीव गमवावा लागला आहे. तरी देखील भाजपाच्या रॅली, रोड शो थांबत नाहीत. सत्तापिपासू भाजपाचा संवेदनशिलपणा संपला आहे. खरतर ही घटना घडल्यानंतर भाजपने रॅली रद्द करायला हवी होती. पण भाजपाला रॅली काढून आनंद मिळताना दिसतोय, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते …
Read More »निर्मला सीतारामण म्हणाल्या, सरकारची रणनीती गुंतवणूकीच्या वाढीवर बीएसईमध्ये विकसित भारत ४७ विषयावर बोलताना व्यक्त केले मत
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सांगितले की, बाजारातील स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी धोरण आणि कर-संबंधित स्थिरता सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुंबईत बीएसईने आयोजित केलेल्या ‘विकसित भारत २०४७- व्हिजन फॉर इंडियन फायनान्शियल मार्केट्स’ या कार्यक्रमात बोलताना सीतारामन म्हणाले की, सरकारची रणनीती गुंतवणुकीच्या नेतृत्वाखालील वाढीवर केंद्रित आहे आणि कल्याणकारी घटकांसह सर्वसमावेशकतेवर …
Read More »नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान
हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप चढवून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांना मानणा-या करोडो शिवभक्तांचा अपमान केला आहे. या अपमानाबद्दल प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मालमत्ता किती आहे, माहित आहे का? मग वाचा बातमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पीएम मोदींच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे ३.०२ कोटी रुपयांची चल संपत्ती आहे, त्यांच्याकडे ५२,९२० रुपये रोख आहेत आणि मात्र नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वतःची जमीन, घर किंवा कार नाही. प्रतिज्ञापत्र पुढे दाखवते की पीएम मोदींचे करपात्र उत्पन्न २०१८-१९ या …
Read More »अमित शाह यांचे आवाहन, … राहुल गांधी यांना सत्तेपासून दूर ठेवा
गेल्या दहा वर्षांची यशस्वी कारकीर्द आणि पुढील पंचवीस वर्षांच्या देशाच्या प्रगतीचा स्पष्ट आलेख असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवून देशाची जनता देशाच्या समृद्धीची, विकासाची वाटचाल सुरू ठेवणार आहे, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शाह यांनी सोमवारी धुळे येथे व्यक्त …
Read More »एस जयशंकर यांचा दावा, मुंबई दहशतवादमुक्त…तर चीन प्रश्न नेहरूंची चूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे दहशतवाद मुक्त आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे पाकव्याप्त काश्मीरही भविष्यात भारताचा भाग होईल, असा विश्वास परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शनिवारी मुंबईत व्यक्त केला. पुढे बोलताना एस जयशंकर म्हणाले की, चीनने भारताचा भूभाग बळकावला तो १९५८ ते १९६३ …
Read More »काँग्रेसचा सवाल, अडवाणी, जोशीप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ री नंतर निवृत्त करणार का?
भारतीय जनता पक्षाने ७५ वर्ष वय झालेल्यांना सक्रीय राजकारणातून बाजूला केले आहे. भाजपा पक्ष संघटन मजबूत करणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांनाही ७५ वर्ष वयाचे कारण देऊन राजकारणातून बाजूला केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही याच नियमानुसार ७५ वर्ष झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त करून अमित शाह यांना पंतप्रधान …
Read More »पुण्याचे काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांचे पोलिस ठाण्याच्या आवारातच धरणे आंदोलन
लोकसभा निवडणूकीसाठी ४ थ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात उद्या १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मात्र प्रथेनुसार प्रत्येक सत्ताधारी पक्षाकडून निवडणूकीच्या आदल्या रात्री मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रलोभने दाखविण्यात येतात. याच प्रलोभनाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एम टॉनिकचा वापर करण्यात येतो. पुण्यातील काँग्रेसचे आमदार तथा लोकसभेचे उमेदवार …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान, या पाच प्रश्नांची उत्तरं द्यावीत
शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना या वर्तमान पत्राचे संपादक संजय राऊत यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. या मुलाखतीतवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका करत पाच प्रश्न उद्धव ठाकरे यांना देत याची उत्तरे देण्याचे …
Read More »
Marathi e-Batmya