काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या नाशिकमधील १० दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचा राहुल गांधींच्या उपस्थितीत समारोप राहुल गांधींनी घेतली जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबियांशी भेट, आदिवासी विद्यार्थ्यांशीही साधला संवाद

काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली समारोपाचा कार्यक्रम झाला. दिनांक २४ ऑगस्ट पासून हे शिबिर सुरु होते.

राहुल गांधी यांचे सकाळी ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.

त्यानंतर राहुल गांधी यांनी एमटीडीसी रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या शिबिरस्थळी राहुल गांधी यांनी राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. या बैठकीला प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, माणिकराव ठाकरे, खा. रजनीताई पाटील, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी.एम. संदीप, रेहाना चिश्ती, वामशी रेड्डी उपस्थित होते.

या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. त्यानंतर शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमात जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांशी संवाद साधला तसेच संगठन विस्तार व काँग्रेसचा विचार स्रवदूर पोहचवण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्यानी जिल्हाध्यक्षांना जिजित्सू मार्शल आर्ट्सची माहिती प्रात्याक्षिकासह दिली. त्यानंतर त्यांनी नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील आंदोलनकारी आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व काँग्रेस पक्ष त्यांच्या या लढ्यात सोबत असल्याचा विश्वास दिला.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.  काँग्रेसची दृष्टी व दिशा, पक्षासमोरील आव्हाने, संघटनात्मक तयारी, काँग्रेसची विचारधारा आणि देशाच्या राजकारणातील पक्षाची भूमिका यावर १० दिवसात सविस्तर चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील प्रमुख नेत्यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. नव्या पिढीतील कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्न, अपेक्षा, मुद्दे आणि राजकीय दृष्टिकोन यांनाही या प्रशिक्षणात विशेष महत्त्व देण्यात आले.

प्रशिक्षणाचा भाग म्हणून दररोज श्रमदान करण्यात आले तसेच ग्रामीण भागातील वास्तव आणि जनतेच्या प्रश्नांची प्रत्यक्ष जाणीव व्हावी यासाठी मनरेगा अंतर्गत प्रत्यक्ष कामाचा अनुभवही त्यांना देण्यात आला. श्रम, संघर्ष, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि जनतेच्या दैनंदिन प्रश्नांचा प्रत्यक्ष अनुभव घेत संघटनात्मक व राजकीय नेतृत्व अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न या प्रशिक्षणातून करण्यात आला.

समारोपाच्या कार्यक्रमावेळी विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री CWC सदस्य नसीम खान, गोवा दिव व दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, खा. प्रणिती शिंदे, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार शोभा बच्छाव, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, प्रदेश काँग्रसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विक्रांत भुरिया, माजी मंत्री वसंत पुरके, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव वामसी रेड्डी, बी. एम. संदीप, रेहाना चिश्ती, राजाराम पानगव्हाणे, शरद अहेर आदी उपस्थित होते.

About Editor

Check Also

राज ठाकरे यांचा सवाल, याला जबाबदार कोण? निवडणूक आयोगाकडून मतचोरी आणि भाजपाला मदत होईल अशा कामकाजावरून केला सवाल

इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्राच्या कालच्या मुख्य पानावरच्या या मथळ्याखालच्या ’14 times in 10 months, two Election …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *