राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फ्री अँड फेअर निवडणुकीच्या धोरणाला हरताळ फासला आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी लोकशाही गुंडाळून टाकली असून पैशाचा खेळ सुरु आहे. मतदानाआधीच घोडेबाजार सुरु असून भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये ‘बाप बड़ा ना भैया, सबसे बड़ा रुपैया’चे वगनाट्य जोरात …
Read More »राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा वचननाम्याच्या निमित्ताने भाजपावर हल्लाबोल महापालिकेच्या ठेवीवरून साधला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा
महापालिकेच्या ठेवीवरून नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ठेवू काय चाटायला नसतात असे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर पलटवार करत म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे ठेवी काय चाटायला नसतात हे अशोभनीय वक्तव्य आहे. मला त्यांना सांगायचं की तुमचं म्हणणं एकदम …
Read More »निवडणूकीत सरकारचा नवा निर्णय, पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ! राजपत्र जारी
शेतकऱ्यांनी घेतलेल्या २ लाख रुपयांपर्यंतच्या शेती किंवा पीक कर्जाशी संबंधित कागदपत्रांवरील मुद्रांक शुल्क (Stamp Duty) पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून महसूल व वन विभागाने १ जानेवारी २०२६ रोजी याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध केले …
Read More »क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल नायगांव येथील सावित्रीबाई फुले यांच्या १९५ वी जयंती कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिपादन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नायगाव येथे उभे राहणारे स्मारक त्यांच्या कार्याची आठवण देईल, त्यामुळे लढण्याची प्रेरणा तर मिळेलच परंतु समाजातील विषमतेच्या विरोधात क्रांतीची बिजे तयार होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महिलांना अधिकार देण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी येथे उभ्या राहणाऱ्या महिला प्रशिक्षण केंद्रात आवश्यक सर्व प्रकारच्या प्रशिक्षणाची …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, निवडणूक आयोगाने मनाची तरी बाळगून राहुल नार्वेकरांवर कारवाई करा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे वर्तन गुंड, मवाल्यासारखे, ते स्वतःला संविधानापेक्षा मोठे समजायला लागले
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पदाचा गैरवापर करत केलेले वर्तन हा आदर्श आचारसंहितेचा भंगच आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले आहे. निवडणूक आयोग प्रामाणिक नाही हे दिसत आहे. निवडणूक आयोगाने जनाची नाही तर मनाची तरी बाळगून आतापर्यंत गुन्हा दाखल करायला हवा होता, पण आयोग हा भाजपाच्या दावणीला बांधलेला आहे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राहुल नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा नार्वेकरांच्या नातेवाईकांच्या प्रचारात सक्रिय विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई करा
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. नार्वेकर यांचे वर्तन आक्षेपार्ह व आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसेच त्यांच्या कार्यालयातील तब्बल ७० अधिकारी व कर्मचारी नार्वेकर यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात सक्रीय भाग घेत आहेत, या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा टीका, आता रेशिमबाग नाहीतर अदानी अंबानी चालवणार भाजपा काँग्रेसमुक्त वल्गणा करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून दुसऱ्या पक्षातील आयत्यावेळी आलेल्यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे. भाजपामध्ये ही नाराजी राज्यभर सर्वदूर दिसत असून ‘काँग्रेसमुक्त भारत’ करण्याची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्तामुक्त भाजपा’ झाला आहे, असा घणाघाती …
Read More »अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ एकर ८ आर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. चिखलदरा येथील सुमारे साडे सात एकर जमीन १९७५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध …
Read More »रामदास आठवले यांच्या रिपाईकडून ३९ उमेदवारांची यादी जाहिर; प्रविण दरेकर भेटणार आठवलेंना मुख्यमंत्री फडणवीस रामदास आठवले यांची नाराजी दूर करणार
नुकतेच मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने रिपाईचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीबाबत जागा वाटपाच्या संदर्भात नाराजी व्यक्त करत भाजपाकडे किमान १६ जागा मागितल्या. परंतु भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर यांनी रामदास आठवले यांची नाराजी दूर करणार असल्याचे जाहिर केले. मात्र आज रामदास आठवले यांनी त्यांच्या पक्षाच्यावतीने ३९ …
Read More »उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन ‘बेटी बचाओ’ ही भाजपाची पोकळ घोषणा, बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी भाजपा उभा
उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी, भाजप आमदार कुलदीप सेंगरची शिक्षा न्यायालयाने निलंबित केल्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्नावसारख्या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीला दिलासा देणारी व्यवस्था भाजपच्या मानसिकतेचे प्रतीक आहे. ‘बेटी बचाओ’ ही केवळ घोषणा असून प्रत्यक्षात भाजप बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. अशा सरकारविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर …
Read More »
Marathi e-Batmya