राज्यात यावर्षी सरसरीपेक्षा दुप्पट, तिप्पट पाऊस पडला आहे. ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यापैकी ३० जिल्हे व जवळपास ३०० तालुके अतिवृष्टी आणि पूरग्रस्त आहेत. राज्यभरात जवळपास १४३ लाख हेक्टरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस सातत्याने पडत असून शेतकरी हवालदिल झाला आहे परंतु राज्यातील महायुती सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही, पालकमंत्र्याने पाहणी सुद्धा केली …
Read More »सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, आमचे नेते फडणवीस आणि अजित पवार मुंडेंबाबत निर्णय घेतील धनंजय मुंडे यांच्या विनंतीचे अर्थ वेगवेगळे निघतात
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यास अटक करण्यात आली. तसेच या अटकेनंतर देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून धनंजय मुंडे हे सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आले. त्यामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. या सगळ्या घडामोडीत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी …
Read More »एकनाथ शिंदे म्हणाले, जीएसटी दरातील बदल देशात महासत्तेची घटस्थापना नवीन जीएसटी बदल म्हणजे गृहस्थी 'सर्वनाश' नव्हे तर ग्रोथ सक्सेस आणि 'गृहस्थी सेव्हिंग टॅक्स', राहुल गांधींच्या टीकेला शिंदेचे प्रत्युत्तर
देशातील जीएसटी दरांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले बदल म्हणजे सर्वसामान्य माणूस, महिला भगिनी आणि छोट्या दुकानदारांना मोठा दिलासा देणारे निर्णय असून मोदींचा हा खरा मास्टर स्ट्रोक असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. जीएसटी दरांमध्ये केलेल्या बदलामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये मोठे बदल होणार असून त्यामुळे लोकांच्या बचतीत …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, जीएसटी…पंतप्रधानांनी ८ वर्षातील लुटीची जबाबदारी घ्यावी वाढीव दराने देशाची लुट केल्याचा केला आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पुन्हा एकदा आपल्या सवयीप्रमाणे जीएसटी GST दर कपातीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. २०१७ मध्ये मोदीजींनीच स्वतः प्रचंड वाढीव दराने जीएसटी GST आणून देशातील उद्योग, व्यापारी आणि सामान्य नागरिक यांना त्रस्त केले, त्यांची प्रचंड आर्थिक लूट केली. तेच मोदीजी आज जीएसटी GST …
Read More »जीएसटी, वाढ रोखणारा कर, काँग्रेसची टीका दिर्घकालीन समस्या सोडविण्यात कमी पडले
काँग्रेसने रविवारी सरकारच्या ताज्या जीएसटी सुधारणांवर टीका केली आणि वस्तू आणि सेवा कराला “वृद्धी-दमन कर” असे म्हटले आणि अलीकडील सुधारणा दीर्घकालीन समस्यांचे निराकरण करण्यात कमी पडल्या. नवरात्रीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित केल्यानंतर, पुढील पिढीतील कर सुधारणांचा शुभारंभ केल्यानंतर आणि “जीएसटी बचत उत्सव” (बचत उत्सव) सुरू होण्याची घोषणा केल्यानंतर …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, दसऱ्याला सीमोल्लंघन करत मोहन भागवतांनी आरएसएस बरखास्त करावा रामराज्याची भाषा करता तर अग्निपरिक्षेला का घाबरता?
आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० वर्षात देशाला नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीसांसारखी भ्रष्ट माणसे दिली. जातीवाद व भांडवलशाहीचा विळखा आणखी घट्ट झाला आहे, ही मनुवादाची देण आहे. आता १०० वर्ष होत असताना पंचागानेही चांगला मुहूर्त दिला असून २ ऑक्टोबर रोजी दसरा, गांधी जयंती व रा. स्व. संघाची शंभरी असा …
Read More »त्या वक्तव्यावरून शरद पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन, व्यक्त केली नाराजी भाजपा आमदार पडळकर यांच्या विधानावरून नाराजी
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ शरद पवार आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्याबद्दल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) ने पडळकर यांच्या विरोधात निदर्शने केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या विधानाशी असहमती व्यक्त केली. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्यावर चर्चा केली. जयंत पाटील हे …
Read More »मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, कौशल्य विकासामुळेच देशाचा विकास शक्य क्षमता वृद्धी व जनजागृती कार्यशाळेचे उद्घाटन
कौशल्य विकास ही देशाच्या प्रगतीची किल्ली आहे. कौशल्य विकास मध्ये फक्त केवळ योजनांची आखणी नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराज्य कौशल्य विकासातील यशोगाथा प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सुसंवाद, समन्वय आणि एकात्मता असणे ही काळाची गरज आहे. राज्य व केंद्र सरकारमध्ये राज्यांनी आपापसात अधिक सुसंवाद ठेवून ‘टीम इंडिया’ म्हणून कार्य करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, फडणवीसांनी तात्काळ राजानीमा द्यावा
भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन सत्ता हस्तगत केली आहे. हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पुराव्यासह उघड केले. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात ६८५० मत चोरी झाल्याचे पुराव्याने सिद्ध झाले असून मतचोरी झाली नाही असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते डोळे उघडे करुन पहावे. फडणवीस यांच्याच पोलिसांनी …
Read More »केशव उपाध्ये यांचा आरोप, राहुल गांधी हे मतचोरीचे बादशाह मतचोरीच्या खोट्या आरोपांबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी
उठसूठ मतचोरीचा डांगोरा पिटणारे राहुल गांधी हे मतचोरीचे बादशाह आहेत. गवगवा करून पत्रकार परिषदा घ्यायच्या, व्हिडिओ सादरीकरण करायचे, काँग्रेसच्या इको सिस्टिमने मतचोरीचा खोटा मुद्दा उचलून धरायचा आणि कोणताही पुरावा सादर न करता केवळ हवा निर्माण करायची हा सध्या काँग्रेसचा धंदा झाला आहे. मतचोरीचा खोटा आरोप करण्याबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी. …
Read More »
Marathi e-Batmya