उद्धव ठाकरे आणि मविआचे घटक पक्ष, महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, ५० हजार एकरी मदत लागलीच द्यावी असा आग्रह धरत आहेत. मात्र त्यापूर्वी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या तोंडाला कशी पाने पुसली होती हे आठवावे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेली कर्जमाफी ही फसवी होती. अटीशर्ती सोबत देऊ केलेली कर्जमाफी म्हणजे राज्य सरकारची बनवाबनवी …
Read More »मंगल प्रभात लोढा यांची माहिती, ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यातील ७५ हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिवर्षी ७५,००० प्रशिक्षणार्थींना ‘ मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रमातून प्रशिक्षित करण्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने निश्चित केले आहे. ९ ऑक्टोबर २०२५ पासून राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयामधून एकूण २,५०६ तुकड्या सुरू होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, सामाजिक- राजकीय आंदोलनाच्या ७७ खटल्यांना दिलासा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठकीत घेतला निर्णय
राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या २०१ अर्जदारापैकी ७७ अर्जदारांवरील खटले मागे घेण्याबाबत शासनाने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने शिफारस केली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली. राज्यातील राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याबाबत शासनाने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहात …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, विधानसभेचे विशेष अधिवेशन घ्या राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात यावी
राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. याबाबत विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र लिहीत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांसह राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर आपत्कालीन परिस्थितीकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. राज्यातील नैसर्गिक …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा यांची टीका, हाहाकार माजला असला तरी केंद्राला अहवालही पाठवला नाही अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, दसरा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्ष हा सुवर्णयोग एकाच दिवशी आलेला आहे. रा. स्व. संघाला १०० वर्षे होत असताना आलेला हा योग संघाने समजून घ्यायला हवा. गांधी पुतळ्याच्या समोर फक्त मानवंदना देऊन चालणारा नाही तर नथुरामचा धिक्कार करून बुरसटलेले विचार, मनुस्मृती व बंच ऑफ थॉट …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसला सवाल, भाजपाच्या दबावामुळे युतीपासून दूर राहतेय का? काँग्रेसकडून युतीचा हात पुढे करण्याकडे वंचित बहुजन आघाडीचे लक्ष
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा आणि त्याचे मित्रपक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षांसोबत युती करण्यास आम्ही तयार असल्याचे मी २१ मे रोजी स्पष्ट केले होते, तसेच माझी पत्नी अंजली आंबेडकर यांनीही १८ जून रोजी त्याच भूमिकेची पुनरावृत्ती केली होती, असे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देणार उत्तर महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येईल, त्यासाठी नियमांची अडचण येऊ दिली जाणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. जळगाव विमानतळावर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधतांना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीएसएनएलच्या स्वदेशी निर्मित ‘४जी’ सेवेचे लोकार्पण बीएसएनएलच्या स्वदेशी '४जी' सेवेमुळे महाराष्ट्र शासनाच्या अकराशे ऑनलाईन सेवा गावागावात मिळण्यात मदत होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘४जी’ तंत्रज्ञानाधारित सेवेचे लोकार्पण झारसुगुडा ओडिशा येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे झाले. याअंतर्गत बीएसएनएलच्या ९२ हजार ६३३ टॉवर्सचे लोकार्पण झाले असून, यापैकी ९ हजार ३० टॉवर्स महाराष्ट्रात उभारले गेले आहेत. या माध्यमातून देशातील तसेच राज्यातील लाखो लोकांपर्यंत ‘४जी’ तंत्रज्ञान पोहोचणार असून …
Read More »बाळासाहेब थोरात यांची टीका, पाषाण हृदयी सरकारला पान्हा फुटत नाही आकडेवारीने अश्रू पुसता येणार नाहीत
अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज बाधित गावांची पाहणी केली. शेतकऱ्यांचे दुःख जवळून अनुभवल्यानंतर माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाथर्डी तालुक्यातील श्री मोहटादेवीचे चरणी प्रार्थना केली की, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ताकद दे आणि संकटात शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची केंद्र …
Read More »रमेश चेन्नीथला यांचा सवाल, आगामी दौऱ्यात तरी मोदी नुकसान ग्रस्त भागात जाणार का? महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत?
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे नैसर्गिक संकट ओढवले आहे, ५० लाख हेक्टर पेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे, १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो जनावरे दगावली आहेत. राज्यात अत्यंत विदारक चित्र असताना महायुती सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही. महाराष्ट्र संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारमधील एकही मंत्री महाराष्ट्रातील …
Read More »
Marathi e-Batmya