Tag Archives: मंत्री

अतुल लोंढे यांचा सवाल, नितेश राणेसारख्या व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे का?… धर्मांधता व द्वेषाच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची देशात पिछेहाट

देशाची एकता व अखंडता राखण्याची शपथ घेऊन मंत्री झालेले नितेश राणे केरळला भारताचा पाकिस्तान म्हणतात आणि भारतीय जनता पक्षाला मतदान न करता काँग्रेस व इतर विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्यांना दहशतवादी म्हणतात, अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? अशी मागणी करत हे राष्ट्र प्रथम म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट करावे, …

Read More »

सुरेश धस यांचा सवाल, “आका” कडे एवढे पैसे कुठून आले? वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केली टीका

बीड जिल्ह्यातील आष्टीचे भाजपा आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने निशाणा साधला आहे. शुक्रवारी त्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले. यावेळी बोलताना सुरेश धस म्हणाले की, ‘आका’कडे १०० ते …

Read More »

चित्रिकरणाच्या परवानग्याना संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा ! सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांचे आदेश

चित्रपट निर्मिती उद्योगाला चालना मिळावी, महाराष्ट्रात जास्तीत जास्त चित्रपटांची निर्मिती व्हावी, त्यातून जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा, तसेच चित्रपट निर्मात्यांना चित्रिकरणाच्या परवानग्या मिळणे सुलभ व्हावे व सुसुत्रता असावी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना लागू करा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज विभागाला दिले. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार …

Read More »

निवडणूकीत सगळा टक्केवारीचा पैसा, कंत्राटदारच सांगतोय ६ व्या मजल्यावरचा तो मंत्री…. कोण तो मंत्री विधानसभा निवडणूकीसाठी पैसा गोळा करतोय

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या तोंड्यावर सर्वच सत्ताधारी पक्षाकडून निधी गोळा कऱण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केल्याची चर्चा राज्याच्या प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयात रंगली असून तो नोटा मोजायची मशिन घेऊन बसणारा सहाव्या मजल्यावरील मंत्री आणि मंत्र्याचा माणूस कोण असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात येत आहे. वास्तविक पाहता राज्याच्या मंत्र्याकडून एखाद्या ठेकेदारावर मर्जी बहाल …

Read More »

गोंडवाना विद्यापीठाची सुधीर मुनगंटीवार यांना मानद डी. लिट. पदवी प्रदान गोंडवाना विद्यापीठाचा ११ वा व १२ वा दीक्षांत सोहळा संपन्न

शिक्षण ही मोठी ताकद आहे, शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले होत असल्याच मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज व्यक्त केले. गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा आणि बारावा दीक्षांत सोहळा राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या प्रांगणात संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर …

Read More »

मंगल प्रभात लोढा यांची घोषणा, रामलीला आयोजनातील अडथळे झाले दूर नवरात्रोत्सवानिमित्त मंगलप्रभात लोढा यांची माहिती

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने आज मुंबईमधील सर्व रामलीला मंडळांना आपले प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आज सर्व रामलीला मंडळांच्या प्रश्नासंदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या ज्यामुळे रामलीला उत्सवाचे आयोजन आता अधिक सोपे होणार आहे. …

Read More »

छगन भुजबळ यांचे आश्वासन, रास्तभाव दुकानदारांना कमिशन वाढवून देणार रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

राज्यात २०१७ नंतर रास्त भाव दुकानदारांचे कमिशन वाढवले नाही. वाढती महागाई आणि वाढता खर्च याचा विचार करता या दुकानदारांचे कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठपुरावा करून मंजूर करून घ्यावा, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. मंत्रालयातील परिषद सभागृहात या विषयावर …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेवर मंत्री उदय सामंत यांचे आवाहन मराठा आरक्षण बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांना जरांगेनी जाब विचारावा

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा उपोषणाचे आंदोलन मागे घेत इथे सलाईन लावून मरण्यापेक्षा आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई लढून मरू असे सांगत मला तुरुंगात टाकण्याचा डाव देवेंद्र फडणवीस यांचा आहे. जर उद्या मला सरकारने तुरुंगात डांबले तर भाजपाची एकही सीट निवडून देऊ नका …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांच्या वाहन ताफ्याच्या सुरक्षेसाठी सशस्त्र पोलीस नियुक्त मंत्री शंभूराज देसाई यांची विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती

मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी एक अधिक एक सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या वाहन ताफा सुरक्षेसाठी एक अधिक तीन सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात ड्रोनद्वारे सर्वेक्षण होत असल्याचे समजताच स्थानिक पोलीस पथक …

Read More »

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र पहिले अद्ययावत प्रशिक्षण केंद्र

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मौजे वाटोळे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाकरीता स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. हे विभागाचे राज्यातील पहिलेच प्रशिक्षण केंद्र आहे. यामध्ये अद्ययावत अशा सर्व सुविधा असणार आहे. विभागातील अधिकारी, जवान, कर्मचारी यांच्या क्षमता वृध्दीसाठी प्रशिक्षण केंद्र उपयोगी ठरणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज …

Read More »