कोणते मटन कोणत्या दुकानातून व कोणाकडून घ्यावे अशा प्रकारचे फतवे मंत्री काढत असतील तर ते योग्य नाही. मंत्रीच अशा पद्धतीने धर्माधर्मात वाद निर्माण करण्याचे काम करत आहेत, यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व ते महाराष्ट्रासाठी योग्य नाही. दुकानदारांना सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार मंत्र्याला कोणी दिला? हा नवीन धंदा स्वतःचे खिसे …
Read More »धनंजय मुंडे यांचा राजीनामा संतोष देशमुख हत्या प्रकरणी नव्हे तर वैद्यकीय… करूणा मुंडे यांच्या भाकितानुसार धनंजय मुंडे यांनी ३ च्या ऐवजी ४ तारखेला राजीनामा
मागील काही महिन्यापासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याची माहिती पुढे आली. वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर बीडमधील अनेक खून प्रकरणांना वाचा फुटली. त्यातच वाल्मिक कराड यांचे आका धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही होऊ लागली. परंतु धनंजय मुंडे …
Read More »पर्यावरण संवर्धनासाठी कमी कार्बन उत्सर्जनवर भर द्यावा माहिती तंत्रज्ञान मंत्री, ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन
सक्षम ‘SAKSHAM-2024-25’ हरित आणि स्वच्छ ऊर्जेद्वारे स्वच्छ वातावरण हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वापरावर भर द्यावा. तसेच कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या पर्यावरण पूरक व्यवस्थेचा वापर करावा. असे आवाहन माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲङ आशिष शेलार यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय समन्वयक, महाराष्ट्र पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू …
Read More »महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी या दोन मंत्र्यांची नोडल म्हणून नियुक्ती मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांच्यावर जबाबदारी
गेली अनेक वर्षे रखडलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर मार्ग काढण्यासाठी गतवर्षी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री एस आर बोम्मई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूच्या मंत्र्याचा समावेश असलेली समिती स्थापन करून त्या माध्यमातून सीमा प्रश्नावर मार्ग काढावा अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करा कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करा
नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे सन २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यांसाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा बैठकीत दिल्या. तसेच हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सन २०२७ मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, भ्रष्ट मंत्री माणिकराव कोकाटे व धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा सरकार भ्रष्ट मंत्र्यांची टोळी बनलीय
भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार भ्रष्ट मंत्र्यांची टोळी बनली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार करताना सर्व मर्यादा सोडल्याचे उघड झाले आहे. आता माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या दोघांना मंत्रीमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी …
Read More »पीएस, ओएसडीचे बँक खाते क्लिअर तरच पोस्टींग, अनेक मंत्री अद्यापही विना स्टाफच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नियमाने अजित पवार, एकनाथ शिंदे वगळता सर्वच मंत्री हैरान
राज्याच्या राजकारणात सत्तास्थानी विराजमान झालेल्या आणि मंत्री पदाचे नाव जाहिर झाल्यापासून संबधित मंत्र्यांकडे पीएस आणि ओएसडी पदावर वर्णी लागावी या साठी अनेक अधिकाऱ्यांचे लॉबिंग सुरु होते. पुढे त्या संबधित पीएस आणि ओएसडीच्या माध्यमातून त्या संबधित मंत्री आणि विभागात काय चालते याची वंदता सर्वतोमुखी आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान, जलयुक्त शिवार अभियानातून महाराष्ट्र जलक्रांतीच्या दिशेने मृद व जलसंधारण विभागात रूजू झाले ६०१ अधिकारी, मुख्यमंत्र्यांचे हस्ते नियुक्तीपत्राचे वितरण
राज्यात जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार अभियान हे महत्वाकांक्षी अभियान असून. या अभियानाच्या माध्यमातून राज्यात लोकसहभागातून झालेली कामे ही जलक्रांतीच्या दिशेने पडलेले पाऊल आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत आयोजित जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) नियुक्ती पत्राचे (रिमोटद्वारे ऑन लाईन …
Read More »पंकजा मुंडे यांचे बीड प्रशासनाला आदेश, राखेच्या बेकायदेशीर साठयांवर कारवाई करा जप्त केलेली वाळू शासकीय घरकुलासाठी उपलब्ध करून द्या
प्रदूषणाच्या नियमाचा भंग होत असल्याने औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील राखेच्या बेकायदेशीर साठयांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज बीडच्या जिल्हा प्रशासनाला दिले. जप्त केलेली वाळू शासकीय घरकुलाच्या बांधकामासाठी उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही देत प्रदुषण नियंत्रणाकडे दुर्लक्ष करत असलेल्या अधिकाऱ्यांची …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, भाजपा युती सरकारचा फक्त एक मंत्री नाही तर सरकारच भ्रष्ट राज्यात अंधश्रद्धाविरोधी कायदा असतानाही तांत्रिक मांत्रिकाचे प्रकार होतात कसे?
महाराष्ट्रात २०१४ ते १९ दरम्यानचे फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे भाजपा युती सरकार असो, या सकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. मलई खाण्याची स्पर्धाच तीन पक्षात सुरु असून केवळ एखादा मंत्री भ्रष्ट आहे असे नाही तर संपूर्ण भाजपा युती सरकारच भ्रष्ट आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस …
Read More »
Marathi e-Batmya