Tag Archives: महावितरण

इंधन बचतीसाठी महावितरणचे एक पाऊल पुढे! पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर सुरु

पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमिवर इंधन बचतीसाठी पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यास महावितरणने कृतीशिल प्रतिसाद दिला असून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह सर्व संचालक आणि कार्यकारी संचालकांनी विद्युत वाहनांचा वापर सुरु केला आहे. दरम्यान सर्व संचालकांसाठी गुरूवारी …

Read More »

दिवसाच्या वीजवापरात ७० लाख ग्राहकांना २२३५ कोटी रुपयांचा लाभ महावितरणची प्रसिद्धीपत्रकान्वये माहिती

राज्यातील वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीजवापरासाठी टीओडी (टाइम ऑफ डे) सवलत जुलै २०२५ मध्ये लागू केल्यापासून आतापर्यंत ७० लाख ग्राहकांना एकूण २२३५ कोटी रुपयांचा लाभ झाला असून त्यामध्ये १५,९०७ उच्चदाब औद्योगिक ग्राहक एकूण १५३४ कोटी रुपयांच्या लाभासह प्रथम स्थानावर आहेत, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली. …

Read More »

महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल, दुरूस्तीचे पूर्वनियोजित कामे सकाळच्या सत्रात उन्हाळ्याच्या तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा उपक्रम

उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे सध्या वेगात सुरु आहे. मात्र उन्हाचा तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करावेत असे निर्देश मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना शनिवारी …

Read More »

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी – महावितरणची आर्थिक पुनर्रचना महावितरणचा आयपीओ येणार ; कृषि वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र वितरण कंपनी

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) कंपनीचे औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती व इतर सर्व बिगर कृषि ग्राहकांसाठीची वितरण संस्था आणि कृषि ग्राहकांना वीज पुरवठा व संबंधित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एमएसईबी सोलार ॲग्रो पॉवर लिमिटेड (एमएसएपीएल) असे विभाजन करून दोन स्वतंत्र कंपन्या स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात …

Read More »

‘आयपीपीएआय’च्या राष्ट्रीय परिषदेत महावितरणचा सहा पुरस्कारांनी गौरव २६ व्या राष्ट्रीय रेग्युलेटर्स अॅण्ड पॉलिसीमेकर्स परिषदेत पुरस्काराचे वितरण

इंडिपेन्डंट पॉवर प्रोड्यूसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या (IPPAI) २६ व्या राष्ट्रीय रेग्युलेटर्स अॅण्ड पॉलिसी मेकर्स परिषदेत महावितरणला ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य ‘आयपीपीएआय पॉवर अवॉर्ड्स-२०२६’ मध्ये विविध सहा पुरस्कारांनी शनिवारी गौरविण्यात आले. यात विशेषतः स्मार्ट ग्रिड, रूफटॉप सोलर, बॅटरी स्टोरेज आणि विद्युत वाहन प्रोत्साहन या वर्गवारीमध्ये महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले. ‘महावितरणने तंत्रज्ञान …

Read More »

महावितरणच्या ऑनलाईन सेवेमुळे ग्राहकांना सुविधा, ५८ हजार ग्राहकांना लाभ ५८ हजार ग्राहकांना नाव बदलाचा तर १० हजार ग्राहकांना भारवाढीचा लाभ

वीज कनेक्शनच्या नावात बदलाच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्याची सुविधा महावितरणने सुरू केल्यानंतर राज्यातील वीज ग्राहकांना त्याचा मोठा लाभ झाला असून दोन महिन्यात ५८,१६७ ग्राहकांनी घरबसल्या नावात बदल (चेंज ऑफ नेम) करून घेतला. त्याचसोबत वीज ग्राहकांना मंजूर भार वाढवून घेण्यासाठी सुरू केलेल्या सुविधेचा १०,४२८ ग्राहकांना लाभ झाला आहे. जीवनसुलभतेसाठी (ईज ऑफ …

Read More »

औद्यगिक न्यायालयात महावितरणच्या ७ कर्मचारी संघटनांची संपातून माघार मेस्मा कायदा लागू केल्यानंतर महावितरणची औद्योगिक न्यायालयात धाव

कामगार आयुक्त कार्यालयात समेट प्रकरणावर कार्यवाही सुरू असताना ७२ तासांच्या बेकायदा संपावर जाणाऱ्या ७ वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीविरुद्ध महावितरणकडून मुंबई औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर शुक्रवारी (दि. १०) झालेल्या सुनावणी दरम्यान संयुक्त कृती समितीने संपातून २४ तासानंतर माघार घेत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, गेल्या दीड दिवसांच्या …

Read More »

महावितरणकडून विद्युत सहायकांची परिमंडलनिहाय निवड यादी जाहीर कागदपत्रांची पडताळणी २० ते २२ ऑगस्टला

महावितरणमध्ये विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या ५ हजार ३८१ उमेदवारांची व संबंधित परिमंडलांची यादी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये २० ते २२ ऑगस्ट दरम्यान करण्यात येणार आहे. या उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद परिमंडल कार्यालयांमध्ये मूळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे तसेच …

Read More »

ऐन हिवाळ्यात विक्रमी वीजेची मागणी महावितरणकडून २५,८०८ मेगावॅटचा पुरवठा

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा शनिवारी ११ जानेवारी रोजी राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली व महावितरणने यापूर्वीच नियोजन केल्यानुसार कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता ही मागणी पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

महानिर्मिती, महापारेषण, महावितरणमधील कंत्राटी कामगारांच्या वेतनामध्ये १९ टक्के वाढ उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये १९ टक्के वाढ करण्यात येत असल्याची घोषणा ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्यादी अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत केली. ही वाढ मार्च २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. राज्यातील ऊर्जासंबंधी कार्यरत या तीनही कंपन्यांमध्ये काम …

Read More »