काही दिवसांपूर्वी मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात कधी दाखल होणार अशी विचारणा सातत्याने करण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर पुणे हवामान वेधशाळेने अंदाज व्यक्त केला असून आगामी दोन दिवसात मान्सून दाखल होण्यास वातावरणीय परिस्थिती अनुकूल आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील ३ ते ४ तासात पावसाचे आमगन होणार असल्याचा इशारा पुणे …
Read More »अखेर मान्सून केरळात दाखलः रेलाम चक्रीवादळाचा कोणताही परिणाम नाही हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला
मे महिन्याच्या सुरुवातीलाच यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्तीचा मान्सून कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला. त्यानंतर बांग्लादेश आणि पश्चिम बंगालच्या समुद्रात रेलाम चक्रीवादळ येणार असल्याचा अंदाजही व्यक्त करत या वादळाचा मान्सूनच्या आगमनावर कोणाताही परिणाम होणार असल्याचे जाहिर केले. तसेच नैऋत्य मौसमी वाऱ्यांच्या हालचालीमध्ये कालपासून कोणताही बदल झाले नसल्याचे सांगत …
Read More »पुढील २४ तासात मान्सूनच्या आगमणासाठी परिस्थिती अनुकूल मात्र कोकण, मराठवाड्यात पुढील काही दिवस उष्ण व दमट वातावरण राहणार
देशातील नैऋत्य मौसमी वाऱ्याच्या परिस्थितीत कोणताही आज बदल झाला नसल्याने आणि मालदीव व दक्षिण अरबी समुद्रातील वाऱ्यांमधून नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा दबाव निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील २४ तासात केरळात मान्सून दाखल होण्यास वातावरण अनुकूल असल्याची माहिती पुणे वेधशाळेने आज दुपारी दिली. त्यामुळे आधीच वातावरणातील उष्म्यामुळे आणि उष्णतेच्या लाटांमुळे कासावीस झालेल्या …
Read More »३१ मे ला मान्सूनचे भारतात आगमन भारतीय हवामान खात्याचा माहिती
भारतीय हवामान विभाग (IMD) ने बुधवारी सांगितले की मान्सून ३१ मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर पोहोचेल, जो मुख्य भूभागातील १ जूनच्या त्याच्या सामान्य वेळापत्रकाच्या दिवसापेक्षा एक दिवस आधी आहे. आयएमडीने असेही म्हटले आहे की नैऋत्य मान्सून १९ मे च्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेटांवर …
Read More »हवामान खात्याची गुडन्युजः यंदाचा मान्सून नियोजित वेळेत आणि सरासरी पेक्षा जास्त
एप्रिल महिन्याच्या मध्यालाच उन्हाचा पारा ४० वर पोहचला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक उन्हाच्या काहीलीने आणि घामाच्या धारांमुळे चांगलाच हैराण झाला आहे. त्यातच यंदाच्या वर्षी मान्सूनने महाराष्ट्रात कमी प्रमाणात हजेरी लावल्याने महाराष्ट्रातील जनतेला आता पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा जून ते सप्टेंबर महिन्यात येणारा मान्सून हा नियोजित वेळेत …
Read More »आगामी मान्सूनची देशात सरासरी हजेरी लावणार-स्कायमेटचा अंदाज १०२ टक्केच्या पाऊसाची हजेरी
२०२३ च्या मान्सूनच्या पावसाचा अचूक अंदाज वर्तविणाऱ्या स्कायमेट या खाजगी हवामान अंदाजकर्त्या कंपनीने २०२४ मध्ये मॉन्सून सामान्य आणि ८७ टक्के सेंटीमीटरच्या दीर्घ कालावधीच्या सरासरी (एलपीए) च्या १०२ टक्के असू शकतो, (+/-) ५ कमी अधिक प्रमाणात कोसळणार असल्याचा अंदाज स्कायमेटने नुकत्याच दिलेल्या अंदाजात वर्तविला आहे. एप्रिल २०२३ मध्ये, स्कायमेटने मान्सूनचा पाऊस …
Read More »हवामान खात्याचा इशाराः पाऊस राहणार महिनाभर मुंबई, कोकणसह मराठवाडा आणि विदर्भात कोसळण्याचा अंदाज
मागील ऑगस्टचा महिना जवळपास कोरडा राहिल्याने राज्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जन्माष्टमीपासून सुरु झालेल्या पावसाने मुंबई कोकणसह मराठवाडा आणि विदर्भात जवळपास महिनाभर हजर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. या कालावधीत अनेक जिल्ह्यांच्या तहानलेल्याना …
Read More »पावसासाठी नव्हे तर या कारणासाठी पुढील २४ तासांकरिता या जिल्ह्यांना येलो अलर्ट अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ६५ – ११५ मि. मी. पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील …
Read More »Monsoon : राज्यातील १४६ तालुक्यांत ७५ ते १०० टक्के पावसाची हजेरी ४ ऑगस्टच्या प्राथमिक अहवालानुसार माहे ऑगस्टमध्ये अतिवृष्टी, पूर व पावसामुळे शेतीपिके व फळपिकांचे ५८.३२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे
राज्यात Monsoon मॉन्सून पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत एकूण ३५५ तालूक्यांपैकी ० तालुक्यात ० ते २५ टक्के, १३ तालुक्यात २५ ते ५० टक्के, १०७ तालुक्यात ५० ते ७५ टक्के, १४६ तालुक्यामध्ये ७५ ते १०० टक्के आणि ८९ तालुक्यात १०० टक्के पेक्षा जास्त पाऊस ( Monsoon ) झाला आहे. त्याचप्रमाणे नाशिक, धुळे, नंदुरबार, …
Read More »पाणी टंचाई : मुंबईच्या सात तलावात फक्त ८३ टक्के पाणी साठा ! पाणी जपून वापरण्याचे मुंबई महापालिकेचे आवाहन
मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी कोणताही प्रमुख तलाव सध्या ओव्हरफ्लो नाही. तसेच जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने मुंबईची पाण्याची चिंता मिटली असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही अशी माहिती महापालिकेच्या जलविभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी टंचाईची चिंता कायमच राहणार असल्याची शक्यता …
Read More »
Marathi e-Batmya