अखेर मान्सून केरळात दाखलः रेलाम चक्रीवादळाचा कोणताही परिणाम नाही हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला

मे महिन्याच्या सुरुवातीलाच यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्तीचा मान्सून कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला. त्यानंतर बांग्लादेश आणि पश्चिम बंगालच्या समुद्रात रेलाम चक्रीवादळ येणार असल्याचा अंदाजही व्यक्त करत या वादळाचा मान्सूनच्या आगमनावर कोणाताही परिणाम होणार असल्याचे जाहिर केले. तसेच नैऋत्य मौसमी वाऱ्यांच्या हालचालीमध्ये कालपासून कोणताही बदल झाले नसल्याचे सांगत आज गुरुवारी संध्याकळापर्यंत मान्सून केरळात हजेरी लावणार असल्याचा अंदाजही भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला होता. त्यानुसार आज अखेर मान्सून केरळ आणि ईशान्य भारतात संध्याकाळी ४ नंतर मान्सूनने हजेरी लावल्याचे भाारतीय हवामान खात्याने सांगितले.

केरळ आणि ईशान्य राज्यातील अनेक भागात मान्सूनने हजेरी लावली. त्यामुळे साधारणतः आठवडाभरानंतर महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मात्र वातावरणात उष्मा आहे. त्यामुळे उत्तर कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण व दमट परिस्थिती असून विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

तर दक्षिण कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (ताशी ४०-५० किमी प्रतितास वेग) हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय पुढील २४ तास मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

https://x.com/Hosalikar_KS/status/1796116359035633819

दरम्यान, मान्सूनने केरळात हजेरी लावल्यानंतर नागालँड, मणीपूर, मिझोराम, अरूणाचल प्रदेश आणि त्रिपुरा, मेघालय व आसाम राज्यातील काही भागातही मान्सूनने हजेरी लावल्याचे सांगितले.

https://x.com/Hosalikar_KS/status/1796118680125751678

About Editor

Check Also

आयएमडीचा इशारा, ऑक्टोंबर महिन्यातही सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस आयएमडीचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांची माहिती

भारतातील पावसाळ्यात ऑक्टोबरमध्ये सामान्यपेक्षा १५ टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *